S M L

मोदींचा आॅटोग्राफ घेणारी तरुणी झाली सेलिब्रिटी,येऊ लागल्या लग्नाच्या मागण्या

News18 Lokmat | Updated On: Jul 28, 2018 10:33 PM IST

मोदींचा आॅटोग्राफ घेणारी तरुणी झाली सेलिब्रिटी,येऊ लागल्या लग्नाच्या मागण्या

पश्चिम बंगाल, 28 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीमध्ये जखमी झालेली रिता मुदी आपल्या शहरात रातोरात सेलिब्रिटी झालीये. पंतप्रधान मोदी यांची सही घेतल्यानंतर तिची चांगलीच ओळख निर्माण झालीये. 16 जुलैला मिदनापूर इथं झालेल्या रॅलीत मंडप कोसळला होता. यात 90 जण जखमी झाले होते. जखमी झालेल्यांची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान मोदी रुग्णालयात पोहोचले होते. त्यावेळी रिता मुदीने पंतप्रधानांची सही घेतली होती. आता पंतप्रधानांची सही घेतल्यानंतर रिताला चक्क लग्नासाठी स्थळं येत आहे.

VIDEO : चिमुकलीने रोखली पावले, म्हणून तो वाचला

एएनआयने रिताची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ती म्हणाली, मी आता सेलिब्रेटी झाली आहे. मला आणि माझ्या बहिणीला लग्नाची स्थळं येत आहे. गावातील लोकं माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी घरी सुद्धा येतात असं रिता उत्साहाने सांगते. पंतप्रधान मोदींनी आपल्या सहीसोबत 'रिता मुदी, तू सुखी रहा' असं लिहिलं होतं.


PHOTOS : अपघातापूर्वीचे अखेरचे 'ते' बसमधील फोटो

16 जुलै रोजी पश्चिम बंगालमधल्या मिदनापूर इथं झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेदरम्यान मंडप कोसळला होता. पंतप्रधानांचं भाषण सुरू असतानाच हा मंडप कोसळला आणि सभेत गोंधळ उडाली. भाषण मध्येच थांबवत पंतप्रधानांनी आपल्या सुरक्षेसाठी असलेल्या एसपीजी अधिकाऱ्यांना जखमींना मदत करण्याच्या सूचना केल्या आणि पंतप्रधानांनी जखमींची विचारपूस करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली होती. जखमींमध्ये काही महिला, पुरूष आणि तरूणही होते. त्यांच्याशी बोलताना पंतप्रधानांनाही गहिवरून आलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 28, 2018 10:31 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close