उमेदवारांनो सावधान ! NOTA ची नाराजी पडणार महागात

उमेदवारांनो सावधान ! NOTA ची नाराजी पडणार महागात

मतदारराजा जागृत झाल्यामुळे या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांना खबरदारी घेऊन उमेदवारांची निवड करावी लागणार आहे. कारण NOTA म्हणजेच 'यापैकी कुणीही नाही' अशा मतांचा परिणाम निवडणुूक निकालांवर दिसून येतोय.

  • Share this:

नवी दिल्ली, १८ मार्च : मतदारराजा जागृत झाल्यामुळे या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांना खबरदारी घेऊन उमेदवारांची निवड करावी लागणार आहे. कारण NOTA म्हणजेच 'यापैकी कुणीही नाही' अशा मतांचा परिणाम निवडणूक निकालांवर दिसून येतोय.

2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींच्या वडोदरा मतदारसंघात १८०३ मतदारांनी NOTA चा हक्क बजावला होता.

NOTA च्या अधिकारावर आतापर्यंत वेगवेगळ्या तऱ्हेने चर्चा झाल्या आहेत. आता मात्र हा केवळ एक निषेधाचा मार्ग राहिलेला नाही.

गेल्या ४ वर्षांत एक कोटी ३३ लाख मतदारांनी हा हक्क बजावला. एखाद्या मो्ठ्या पक्षाच्या मतादानाच्या आकडेवारीवर NOTA चा परिणाम दिसत नसला तरी काही उमेदवारांना मिळणारी मतं ही NOTA पेक्षाही कमी आहेत.

२०१८ मध्ये छत्तीसगड, मिझोरम, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा इथल्या निवडणुकांमध्ये आप, समाजवादी पक्ष या पक्षांना मिळालेल्या मतांपेक्षा NOTA चा आकडा मोठा होता.

मध्य प्रदेशच्या बीना मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसच्या उमेदावारामध्ये ६३२ मतांचा फरक होता पण NOTA मध्ये १ हजार ५२८ मतं पडली.

योग्य उमेदवार नसेल तर NOTA

राजस्थानमध्ये तर १६ जागा अशा होत्या जिथे विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवारामध्ये अगदी कमी फरक होता. त्यापेक्षा NOTA च्या मतांची संख्या जास्त होती.

सीएसडीएस च्या संजयकुमार यांच्या मते, मतदारांना ज्या पक्षाला मत द्यायचं आहे तो पक्ष जिंकत नसेल तर मतदार NOTA वापरतात. अशा स्थितीत मोठ्या पक्षांनी जर योग्य उमेदवार निवडले नाहीत तर जास्तीत जास्त लोक NOTA चा हक्क बजावतील.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत NOTA ने काही उमेदवारांच्या भवितव्याला धोका निर्माण केला होता. या निवडणुकीत सुमारे ६० लाख मतं NOTA ला देण्यात आली होती. जनता दल सेक्युलर आणि सीपीआय या पक्षांना याहीपेक्षा कमी मतं मिळाली होती.

NOTA ला सगळ्यात जास्त मतं मिळाली तर त्याठिकाणी काल्पनिक उमेदवार मानून पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल, असे आदेश राज्यांच्या निवडणूक आयोगाने याआधी काढले आहेत. त्यामुळेच राजकीय पक्षांनी जर चांगले उमेदवार दिले नाहीत तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार आहेत.

===============================================================================================================================

<iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-352982" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/MzUyOTgy/"></iframe>

First published: March 18, 2019, 8:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading