• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • संघटनांची नावं बदलली पण दहशत कायम, पाकिस्तान कधी करणार कारवाई ?

संघटनांची नावं बदलली पण दहशत कायम, पाकिस्तान कधी करणार कारवाई ?

भारताच्या गृहमंत्रालयाने 41 दहशतवादी संघटनांवर बंदी घातली आहे. यापैकी अर्ध्या संघटना पाकिस्तानमध्ये आहेत किंवा पाकिस्तानमधून त्यांना आर्थिक मदत मिळते.

 • Share this:
  नवी दिल्ली, 4 मार्च : पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या नावाने दहशतवादी संघटनांचा हैदोस सुरूच आहे. एका संघटनेवर बंदी घातली की तीच संघटना दुसऱ्या नावाने डोकं वर काढते. याच पद्धतीने पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 69 दहशतवादी संघटनांची नोंद झाली आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांचं नंदनवन बनला आहे, असं विधान भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्या चीन दौऱ्यात केलं होतं. पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये भारताने हवाई हल्ला केल्यानंतर सुषमांचा हा दौरा होता. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानवर जागतिक पातळीवरचा दबाव आला आणि ‘जमात उद दावा’ या संघटनेवर पाकने बंदी घातली. ‘फलाह ए इन्सानियत’ या संस्थेवरही बंदी घालण्यात आली. याआधी या दोन्ही संस्थांच्या कारभारावर पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी प्राधिकरणाने करडी नजर ठेवली होती. पण तरीही संघटनांविरुद्ध कोणतीही ठोस पावलं पाकिस्तानने उचलली नाहीत, असा भारताचा आक्षेप आहे. पाकिस्तानमध्ये आत्ताच्या घडीला 69 दहशतवादी संघटनांच्या कारवाया सुरू आहेत. ‘जमात उद दावा’ आणि ‘फलाह ए इन्सानियत’ या संघटनांवर पाकिस्तानने बंदी घातली तरी पुन्हा अल मदिना आणि ऐसार फाउंडेशन या नावांनी या संघटनांनी डोकं वर काढलं, असं पाकिस्तानच्या ‘डेली टाइम्स’ मधल्या रिपोर्टमध्येच म्हटलं आहे. 41 दहशतवादी संघटनांवर बंदी  भारताच्या गृहमंत्रालयाने 41 दहशतवादी संघटनांवर बंदी घातली आहे. यापैकी अर्ध्या संघटना पाकिस्तानमध्ये आहेत किंवा पाकिस्तानमधून त्यांना आर्थिक मदत मिळते. यातल्या बऱ्याच संघटना बंदी घातल्यानंतरही नव्या नावाने अवतरल्या आहेत. यातली ‘जमात उद दावा’ ही हाफिज सईद याची संघटना. या संघटनेवर मागच्या वर्षी बंदी घालण्यात आली. नंतर ही बंदी उठवण्यात आली. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषेदेने याआधीच या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. त्यामुळे ही बंदी उठवल्यानंतर पाकिस्तानवर जोरदार टीका झाली.

  PHOTOS : भारत Vs पाकिस्तान कुणाच्या सैन्यात आहे किती ताकद?

  जमात उद दावा या संघटनेची स्थापना हाफीज सईदने १९८७ मध्ये केली. ‘लष्कर ए तोयबा’ या संघटनेवर बंदी घातल्यानंतर ‘जमात उद दावा’ ची स्थापना झाली, असं बोललं जातं. त्याचबरोबर ‘फलाह – ए – इन्सानियत’ ही संस्था जमात उद दावा या संघटनेचीच संलग्न संघटना मानली जाते. गेल्या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष मामनून हुसेन यांनी अध्यादेश काढून पाकिस्तानच्या जमात उद दावा आणि फलाह ए इन्सानियत या संघटनांना बंदी घातलेल्या संघटना म्हणून जाहीर केलं होतं. पाकिस्तानने लष्कर ए तोयबा, पासबान – ए – अहल आणि पासबान – ए – काश्मीर या संघटनांवरही 2018 मध्ये बंदी आणली. यानतंर जमात उद दावा आणि लष्कर ए तोयबा या संघटनांची संपत्ती गोठवण्याचे आदेश देण्यात आले. या संघटनांवर देणग्या गोळा करण्यावरही बंदी घालण्यात आली. पण त्यानंतर या अध्यादेशाची अमलबजावणी झालीच नाही. हा अध्यादेश कधीही पाकिस्तानच्या संसदेतही मांडला गेला नाही. हाफीज सईदने या अध्यादेशाला लाहोर हायकोर्टात आव्हान दिलं आणि त्यानंतर पाकिस्तानने जमात उद दावा आणि फलाह ए इन्सानियत या संघटनांवरची बंदी उठवली. त्यानंतर नोव्हेंबर २०१८ मध्ये हाफीज सईदलाही सोडण्यात आलं. हाफीज सईदला २०१७ पासून नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. बंदी घालणं आणि उठवणं ही साखळी सुरूच ‘जमात उद दावा’ या संघटनेवरही करावाई करण्यात आली. त्यावेळी या गटाने आपलं नाव ‘तहरीक ए आजादी जम्मू अँड काश्मीर’ असं केलं. या संघटनेवरही २०१७ मध्ये बंदी घालण्यात आली. ‘लष्कर ए तोयबा’ ही याच दशतवादी संघटनेशी जोडली गेलेली संघटना आहे. याच संघटननेने मुंबई हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यावर बंदी घालणं आणि उठवणं ही साखळी सुरूच होती.

  LOC वरून ग्राउंड रिपोर्ट : रहिवासी म्हणतात, अशी स्थिती तर 1965 च्या युद्धातही अनुभवली नव्हती

  बंदी असल्याच्या काळातही ‘लष्कर ए तोयबा’ ने काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ले घडवले. जमात उद दावा या संघटनेसोबतच लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद, लष्कर ए झंगवी, तहरिक ए तालिबान आणि सिपाह ए साहेबा पाकिस्तान या संघटनांनी पाकिस्तानमध्येच अनेक दहशतवादी हल्ले केले. त्यात हजारो जण मृत्युमुखी पडले. पाकिस्तानचं नेमकं धोरण काय आहे दहशतवादी संघटनांबद्दल पाकिस्तानचं नेमकं धोरण काय आहे याबद्दल एक सर्व्हे घेण्यात आला होता. यात, पाकिस्तानी नागरिकांना तहरिक ए तालिबान पाकिस्तान, लष्कर ए तोयबा आणि अल कायदा या संघटनांबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यानुसार,पाकिस्तान या संघटनांना तेवढा अनुकूल नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला. या सर्वेक्षणात 14 टक्के लोकांनी लष्कर ए तोयबा बद्दल अनुकूल मत दर्शवलं तर 9 टक्के नागिरकांनी तहरिक ए तालिबान पाकिस्तान, या संघटनेबद्दल अनुकूल मत नोंदवलं होतं. हिज्बुल मुजाहिद्दीन आणि हरकत उल मुजाहिद्दीन या संघटनांनी काश्मीरमध्ये घातपाती कारवाया घडवून आणल्या आहेत पण तरीही पाकिस्तान या संघटनांवर बंदी घालायला तयार नाही. लष्कर ए झंगवी आणि तहरीक ए तालिबान या संघटनांना अमेरिकेने दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केलं आहे. या दोन्ही संघटनांचा आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचंही उघड झालं आहे. दहशतावादाचं आव्हान कायम..! पाकिस्तानमधल्या पेशावरमध्ये डिसेंबर 2014 मध्ये झालेला हल्ला ‘तहरिक ए तालिबान पाकिस्तान’ या संघटनेने केला होता. उत्तर वजिरीस्तानमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधातल्या करवाईचा निषेध म्हणून आपण हा हल्ला केला, असं या संघटनेने म्हटलं होतं. पण या संघटनेवरही तीव्र स्वरूपाची कारवाई झाली नाही. जोपर्यंत पाकिस्तान या दहशतवादी संघटनांवर बंदीची कारवाई खऱ्या अर्थाने अमलात आणत नाही तोपर्यंत पाकिस्तानसह सगळ्याच देशांसमोर हे दहशतावादाचं आव्हान कायम असणार आहे.

  VIDEO : ...जेव्हा सुप्रिया सुळेंना उचलून पती सदानंद यांनी चढल्या जेजुरीच्या पायऱ्या

  First published: