शपथविधी समारंभात लक्ष वेधलं ते मायावती-सोनियांच्या केमेस्ट्रिने

शपथविधी समारंभात लक्ष वेधलं ते मायावती-सोनियांच्या केमेस्ट्रिने

सोनिया जवळ आल्यानंतर मायवतींशी त्यांनी हस्तांदोलन केलं आणि गळाभेट घेतली. आपल्या जवळचं माणूस बऱ्याच दिवसानंतर भेटावं एवढ्या आपुलकीनं आणि प्रेमाणं त्या ऐकमेकिंशी बोलत होत्या.

  • Share this:

बंगळुरू,ता.23 मे: जेडीएसचे नेते एच.डी कुमारस्वामी यांच्या शपथविधी समारंभाला देशभरातले सर्व विरोधीपक्ष नेते उपस्थित होते. मात्र या सगळ्यांमध्ये लक्ष वेधलं ते मायावती आणि सोनिया गांधींच्या केमेस्ट्रीने. व्यासपीठावर आल्यानंतर मायावती एकेकाळचे कट्टर शत्रू अखिलेश यादव यांच्या शेजारी बसल्या आणि त्यांच्यात गप्पांचा फड रंगला.

सर्वात शेवटी सोनिया गांधी आणि राहुल यांचं आगमन झालं आणि सर्व वातावरणच बदलून गेलं. सोनिया जवळ आल्यानंतर मायवतींशी त्यांनी हस्तांदोलन केलं आणि गळाभेट घेतली. आपल्या जवळचं माणूस बऱ्याच दिवसानंतर भेटावं एवढ्या आपुलकीनं आणि प्रेमाणं त्या ऐकमेकिंशी बोलत होत्या. शपथविधी कार्यक्रमानंतर सर्व नेते एका रांगेत उभे राहिले त्यावेळीही मायावती आणि सोनिया जवळ उभ्या होत्या.

दोघींमध्ये अत्यंत जिव्हाळ्याचं बोलणं होत होतं. तर राहुल गांधी ही ते सर्व बघत होते. उत्तर प्रदेशात आत्ता आत्तापर्यंत मायावती काँग्रेसवर घणाघाती प्रहार करत होत्या. आक्रस्ताळ्या अशी प्रतिमा असेलेल्या मायावती आणि सोनियांची ही केमेस्ट्री सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होती.

 

First published: May 23, 2018, 8:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading