किती अनिवासी भारतीय घरी पैसे पाठवतात?

परदेशात राहून घरी पैसे पाठवणाऱ्यांमध्ये भारतीयांचा क्रमांक सगळ्यात वरचा आहे, असं वर्ल्ड बँकेने म्हटलं आहे. 2018 मध्ये अनिवासी भारतीयांनी आपल्या देशात सुमारे 5.53 लाख कोटी रुपये पाठवले आहेत. घरी पैसे पाठवणाऱ्यांमध्ये भारत आणि चीनच्या खालोखाल मेक्सिकोचा क्रमांक आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 9, 2019 08:50 PM IST

किती अनिवासी भारतीय घरी पैसे पाठवतात?

वॉशिंग्टन, 9 एप्रिल : भारतीय लोक जगभरात विखुरलेले आहेत. परदेशात राहणाऱ्या आपल्या मुलांनी घरी मदत करावी, अशी त्यांच्या आईवडिलांची अपेक्षा असते. भारतीय मुलं ती पूर्णही करतात, असं समोर आलं आहे.

परदेशात राहून घरी पैसे पाठवणाऱ्यांमध्ये भारतीयांचा क्रमांक सगळ्यात वरचा आहे, असं वर्ल्ड बँकेने म्हटलं आहे. 2018 मध्ये अनिवासी भारतीयांनी आपल्या देशात सुमारे 5.53 लाख कोटी रुपये पाठवले आहेत. घरी पैसे पाठवणाऱ्यांमध्ये भारत आणि चीनच्या खालोखाल मेक्सिकोचा क्रमांक आहे.

भारतातल्या भक्कम कुटुंबव्यवस्थेमुळे हे प्रमाण जास्त असावं, असं तज्ज्ञांचं मत आहे.

काय आहे रेमिंटन्स?

आखाती देश तसंच अमेरिका आणि ब्रिटनमध्ये काम करणारे डॉक्टर, इंजिनिअर्स आपले आईवडील आणि कुटुंबीयांना नियमित पैसे पाठवतात. जेव्हा एखादा अनिवासी भारतीय दुसऱ्या देशातून आपल्या देशात पोस्ट ऑफिस किंवा ऑनलाइन ट्रान्सफरने पैसे पाठवतो त्याला रेमिंटन्स असं म्हणतात. याच रेमिंटन्समध्ये भारताचा क्रमांक सगळ्यात वरचा आहे.

Loading...

केरळच्या पुरामुळे काय झालं ?

केरळमधल्या पुरानंतर जगभरातून भारतात मदतीचा ओघ सुरू झाला. त्यामुळेही विदेशातून भारतात येणाऱ्या पैशाचं प्रमाण वाढलं,असं वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट सांगतो.

याउलट पाकिस्तानमध्ये येणाऱ्या पैशात मात्र घट झाली आहे. विदेशातून येणाऱ्या पैशापैकी पाकिस्तानला सगळ्यात जास्त पैसे सौदी अरेबियातून येतात. पण तिथून येणारे पैसे कमी झाल्यामुळे रेमिंटन्समध्ये फक्त 7 टक्क्यांची वाढ झाली. पण बांगलादेशला मागच्या वर्षी 15 टक्के जास्त रेमिंटन्स मिळाला.पाकिस्तान आधीच बेरोजगारी आणि गरिबीच्या खाईत सापडला आहे. त्यातच रेमिंटन्स कमी झाल्यामुळे पाकिस्तानवर आर्थिक संकट ओढवलं आहे.

2018 मध्ये चीन सोडून बाकी देशांना परदेशी गुंतवणुकीपेक्षाही रेमिंटन्समधून पैसे मिळाले. यामध्ये भारताचा क्रमांक सर्वात वरचा आहे.

================================================================================================================================================================

VIDEO अक्षरमंत्र : असं काढा सुंदर अक्षर; अर्थात कॅलिग्राफीचे ऑनलाईन धडे (भाग 3)


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 9, 2019 08:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...