राष्ट्रपतींची निवड कशी होते ?, कशी असते निवडणूक प्रक्रिया ?

120 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या या देशाचा राष्ट्रपती निवडला कसा जातो? ज्या देशात निवडणुका लोकशाहीचा उत्सव म्हणून पाहिल्या जातात तिथे राष्ट्रपतीपदाचा मानकरी कसा ठरत असेल?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2017 10:24 PM IST

राष्ट्रपतींची निवड कशी होते ?, कशी असते निवडणूक प्रक्रिया ?

07 जून : जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश म्हणजे भारत...या लोकशाहीचे सर्वोच पद म्हणजे राष्ट्रपती. 120 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या या देशाचा राष्ट्रपती निवडला कसा जातो? ज्या देशात निवडणुका लोकशाहीचा उत्सव म्हणून पाहिल्या जातात तिथे राष्ट्रपतीपदाचा मानकरी कसा ठरत असेल?चला हेच थोडक्यात जाणून घेऊया...

राष्ट्रपती कोण होऊ शकतात ?

भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी काही निकष आहेत

-उमेदवाराचे वय 35हून अधिक असावे.

-50 निवडलेल्या (नामांकित नव्हे) आमदारांचा वा खासदारांचा त्याला पाठिंबा असावा

Loading...

-उमेदवार भारताचा नागरिक असावा

-15 हजार रूपये  अनामत रक्कम आरबीआयमध्ये त्याने जमा केलेले असावे.

राष्ट्रपती निवडले कसे जातात?

 राष्ट्रपतीपद हे भारताचे सर्वोच्च संविधानिक पद आहे. संविधानातील कलम 54 आणि 55 या निवडीवर भाष्य करतात.

या देशातील लोक प्रत्यक्ष मतदान करून राष्ट्रपती निवडत नाहीत. तर लोकांनी ज्यांना निवडले ते लोकसभेचे खासदार, विधानसभेचे आमदार आणि राज्यसभेचे खासदार राष्ट्रपतीपदासाठी मतदान करतात आणि राष्ट्रपती निवडतात. यातले सगळे प्रतिनिधी हे निवडलेले असतात. कुठलाही नामांकित प्रतिनिधी या निवडणुकीसाठी मतदान करु शकत नाही.

हे मतदान गुप्त पद्धतीने होते. कुणी कुठल्या उमेदवाराला मत दिले हे शेवटपर्यंत कळत नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कुठलाही पक्ष त्यांच्या उमेदवारासाठी वा इतर उमेदवारासाठी व्हीप लागू करू शकत नाही. प्रत्येक मतदाराला कुठल्याही उमेदवारास मत देण्यास स्वतंत्र असतो.

निवडणूक प्रक्रियेतील वेगळेपण

राष्ट्रपतीपदाची निवडणूक थोडी वेगळी असते. इथं प्रत्येक मतदाराच्या अर्थात प्रतिनिधीच्या मताला एक वेगळे मत मूल्य असते. प्रत्येक आमदाराचे मत मूल्य खालील प्रमाणे ठरवले जाते.

(राज्याची एकूण लोकसंख्या /राज्यातीत एकूण आमदारांची संख्या )/1000. या  लोकसंख्येची आकडेवारी 1971च्या सेन्सस मधून घेतली जाते. सर्वाधिक मतं मूल्य हे उत्तर प्रदेशाच्या आमदाराचे 208 इतके आहे तर सर्वात कमी 8 गोव्याच्या आमदाराचे आहे. खासदाराचे मत ही अशाच एका फॉर्म्युल्याने ठरवले जाते. सध्या प्रत्येक खासदाराचे मत मूल्य 708 इतके आहे.

प्रत्येक मतदाराला मतदान केवळ एका उमेदवाराला करत नाही. तो प्रत्येक उमेदवाराला प्राधान्य क्रमाने मतदान करतो.उदा.अ-ब-क हे  3 उमेदवार असतील. तर तो खालीलप्रमाणे प्राधान्यक्रम ठरवून मतदान करू शकतो.

1 अ

2 ब  

3 क

प्रत्येक मतदात्याला प्रथम प्राधान्य देणे बंधनकारक असते. तर 2रा आणि 3ऱ्या प्राधान्याचा रकाना भरणे ऐच्छिक असते.

मतदान ही वेगळ्या प्रकारचे असल्याने मतमोजणी ही वेगळ्या प्रकारे होते.

मतमोजणी

मतमोजणीसाठी एक वेगळा फॉर्म्यूला वापरला जातो.

(एकुण ग्राह्य मते /2)1  =विजयासाठी आवश्यक मते.

समजा एकूण मते 20 असतील तर

20/2=10

101=11

आता समजा

1. अ ला 11 मते प्रथम प्राधान्याची मिळाली.

2. ब ला  5 मते प्रथम प्राधान्याची मिळाली.

3.  क ला 4 मते प्रथम प्राधान्याची मिळाली.

तर विजेता अ ठरतो.

पण जर

1. अ ला 9 मते प्रथम प्राधान्याची मिळाली.

2. ब ला  7 मते प्रथम प्राधान्याची मिळाली.

3. क ला  4 मते प्रथम प्राधान्याची मिळाली.

  इथे कुणालाच 11 मतं मिळाली नाही मग ज्याला सगळ्यात कमी मते मिळाली तो स्पर्धेतून बाहेर पडतो.

त्याची मतं वरच्या दोघांमध्ये वाटली जातात.आणि जोपर्यंत एकच उमेदवार विजयापुर्ती मतं मिळवत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया रिपीट केली जाते.

तर अशा लांबलचक प्रक्रियेतून भारताचा राष्ट्रपती निवडला जातो. आता बघू पुढचा राष्ट्रपती कोण होतंय ते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2017 10:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...