कर्नाटकचा विजय भाजपसाठी किती महत्त्वाचा ?

कर्नाटकचा विजय भाजपसाठी किती महत्त्वाचा ?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय.

  • Share this:

कर्नाटक, 15 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. भाजपने 106 जागांवर आघाडी घेतली असली तरी बहुमताने हुलकावणी दिलीये. पण तरीही भाजपसाठी हा विजय महत्त्वाचा आहे.

मागील निवडणुकीत भाजपच्या वाट्याला फक्त 40 जागा आल्या होत्या. यावेळी भाजपच्या दुप्पटीने जागा वाढल्यात. या विजयामुळे भाजपचे दक्षिणेचं द्वार खुलं झालंय. 2019 च्या निवडणुकांसाठी भाजपची आगेकूच झालीये. आणखी काही महत्त्वाचे मुद्दे....

भाजपसाठी किती महत्वाचं

- या विजयाने भाजपला दक्षिणेचं व्दार खुलं झालं

- तमिळनाडू आणि केरळमध्ये विस्तारासाठी फायदा

- आगामी चार राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी मनोबल वाढेल

- 2019 ची दावेदारी आणखी मजबूत

- पक्षावर नरेंद्र मोदी आणि अमित शहांची पकड मजबूत

- पक्षातल्या काही खासदार आणि आमदारांचे विरोधातले स्वर शांत होतील

- यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हांना धक्का बसेल

First published: May 15, 2018, 2:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading