कोझिकोड, 8 ऑगस्ट : केरळ (Kerala) स्थित कोझिकोड एअरपोर्टवर ( Kozhikode Plane Crash) झालेल्या अपघातात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील अनेकजण अद्यापही रुग्णालयात भर्ती आहेत. तर एअरपोर्टवर तैनात केंद्रीय औद्योगिक बल म्हणजेच CISF चा जवान अजीत सिंह यांनी या संपूर्ण अपघाताची परिस्थिती कथन केली. त्यांच्या डोळ्यांदेखत हा अपघात झाला. ते म्हणाले, मी एयर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाइटला पॅरामीटर रोडवर कोसळताना पाहिलं.'
अजित यांनी सांगितले की हा विमान अपघात मी माझ्या डोळ्यांनी पाहिला. अजित यांनी पुढे सांगितले की, सायंकाळी 7.30 वाजता मी तिसऱ्या राऊंडसाठी निघालो होतो. यादरम्यान आपात्कालिन फायर गेटवर पोहोचलो आणि तेथे ASI मंगल सिंह ऑन ड्यूटी होते.' अजित यांनी सांगितले की, मी सही करण्यासाठी बीट बुक मागितलं आणि यानंतर मंगळशी बोलत होतो. तेव्हा पाहिलं की एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट आपलं संतुलन गमावून पॅरामीटर रोडवरुन खाली कोसळत होतं. अजित पुढे म्हणाला की, त्याचवेळी याबाबत कंट्रोल रुमला सांगण्यात आलं आणि तोपर्यंत विमान जमिनीवर कोसळलं होतं.
#WATCH Central Industrial Security Force's ASI Ajeet Singh, an eye witness to #KozhikodePlaneCrash, narrates the incident.
Says, "I saw the Air India Express flight falling down towards the parameter road." pic.twitter.com/kKdQYujrl4 — ANI (@ANI) August 8, 2020
गेट नंबर 1 तातडीने खोलण्यात आलं आणि तब्बल 25 ते 30 प्रतिनिधी आत गेले. जेसीबी आली. त्यानंतर विमानाच्या ढिगाऱ्यातून दाबलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. आम्ही CISF चे जवान विमानाच्या आतील प्रवाशांना बाहेर काढत होतो. रुग्णवाहिका आली आणि त्यात प्रवाशांना पाठविण्यात आलं. विमानाचे दोन तुकडे झाले होते. शक्य तितक्या तातडीने सर्वजण ढिगाऱ्यातून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.