पंतप्रधान मोदी असताना चीनने जमीन हिसकावून घेतलीच कशी? राहुल गांधी पुन्हा बरसले

पंतप्रधान मोदी असताना चीनने जमीन हिसकावून घेतलीच कशी? राहुल गांधी पुन्हा बरसले

भारत-चीन मुद्द्यावरुन काँग्रेस नेत्यांकडून मोदींसमोर अनेक सवाल उपस्थित केले जात आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 12 जुलै : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी लडाख प्रकरणावर पुन्हा एकदा मोदी सरकारला घेराव घातला. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतानाही चीनने भारताची पवित्र जमीन हिसकावून घेतली?

राहुल गांधींनी एक बातमी ट्वीट करून मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, ज्यात एका सुरक्षा तज्ज्ञाचा दावा आहे की एलएसी प्रकरणावरून चीनशी झालेल्या तणावामुळे केंद्र सरकार माध्यमांची 'दिशाभूल' करीत आहे. गलवान खोऱ्यातील ही परिस्थिती भारतासाठी हानिकारक ठरेल.

हाच अहवाल ट्विट करीत राहुल गांधी म्हणाले, " असं काय झालं की  मोदीजींच्या काळात चीनने भारताची पवित्र जमीन हिसकावून घेतली?"

हे वाचा-काँग्रेसला बसणार आणखी एक हादरा, भाजप या राज्यातही सत्ता उलथवणार?

लडाखमधील एलएसीवरून गलवान खोऱ्यात चिनी सैन्यासह रक्तरंजित संघर्ष झाल्यापासून राहुल गांधी सतत मोदी सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. या विषयावर राहुल गांधी म्हणाले की पंतप्रधान मोदी चीनच्या दाव्याला घेऊन उभे आहेत, परंतु ते आमच्या सैन्यासमवेत उभे असल्याचे दिसत नाही.

दरम्यान काही दिवसांपूर्वी लडाख जवळच्या हॉट स्प्रिंगमधल्या पाईंट 15 इथून भारत आणि चीनचे सैनिक 2 किलोमीटर मागे फिरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांची बोलणी सुरू होती. त्यानंतर तणाव कमी करण्यासाठी सैनिक मागे घ्या अशी सूचना भारताने केली होती. भारत कुठल्याही दबावाला आणि धमक्यांना घाबरणारा नाही आणि बळीही पडणार नाही असं भारतीय अधिकाऱ्यांनी चीनला स्पष्टपणे सुनावलं होतं. त्यामुळे तणाव वाढणार असं दिसताच चीनने आपलं सैन्य मागे बोलविण्याचा निर्णय घेतला.

Published by: Meenal Gangurde
First published: July 12, 2020, 4:00 PM IST

ताज्या बातम्या