Home /News /national /

जीवनावश्यक सेवा पुरविणाऱ्यांना राज्य सरकारकडून 'पास' सेवा, कसा मिळवाल पास?

जीवनावश्यक सेवा पुरविणाऱ्यांना राज्य सरकारकडून 'पास' सेवा, कसा मिळवाल पास?

हा पास केवळ जीवनावश्यक सेवा पुरविणाऱ्यांना दिला जाणार आहे

    मुंबई, 26 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narednra Modi) यांनी कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा केली आहे. त्यामुळे 15 एप्रिलपर्यंत नागरिकांना अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त बाहेर जाण्यास सक्त मनाई आहे. जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव पर्याय आहे. यासाठी लॉकडाऊन करणे अत्यावश्यक आहे. मात्र लॉकडाऊनदरम्यान नागरिक विनाकारण घराबाहेर जात असल्याचे समोर आले आहे. हे टाळणे आवश्यक आहे. लॉकडाऊनदरम्यान जीवनावश्यक सेना पुरविणारे, व्यापारी, वाहन-चालक, पत्रकार, मदत करणारे यांना पास पुरविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे मोठा अडथळा दूर होणार आहे. हा पास पोलिसांना दाखविल्यानंतरच त्यांना अडविण्यात येणार नाही. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्य नागरिकही पेट्रोलची खरेदी करीत आहे. मात्र अत्यावश्यक सेवेवर ताण येऊ नये यासाठी राज्य सरकारने पास ही सेवा सुरू केली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांना कोणताही अडथळा येणार नाही. संबंधित - Breaking : मुंबईत आणखी एक मृत्यू; राज्यात दिवसभरातला कोरोनाचा दुसरा बळी कुठे मिळेल हा पास? नागरिकांना पास काढण्यासाठी स्थानिक पोलीस स्थानकात जावे लागणार आहे. पास देण्यासाठी पोलीस ठाण्यात स्वतंत्र यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांनाच हा पास दिला जाणार आहे. दरम्यान महाराष्ट्रात Coronavirus चा धोका वाढत आहे. आज दिवसभरात दुसऱ्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे केवळ महाराष्ट्रातच रुग्णांची संख्या वाढून 125 इतकी झाली आहे. मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या 63 वर्षीय महिलेचा आज मृत्यू झाला आहे. त्यापूर्वी नवी मुंबईत एकीचा मृत्यू झाल्यामुळे कोरोना मृत्यूंची संख्या राज्यात 5 झाली आहे. सकाळी वाशीमध्ये एका खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला. आज सकाळी नागपुरात आणखी एक 42 वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.  वाशीत झालेल्या मृत्यूविषयी मिळालेल्या माहितीनुसार, 24 मार्चला या महिलेचा मृत्यू झाला होता. आज शवविच्छेदन अहवाल हाती आला असता हा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचं समोर आलं. मृत महिला ही उपचारासाठी वाशीमधल्या 2 खासगी रुग्णालयात गेली होती, अशीही माहिती समोर येत आहे. यावरुन महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या हूळूहळू वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांना अडथळा येऊ नये यासाठी राज्य सरकारकडून पास सेवा सुरू करण्यात आली आहे. याशिवाय अनेक राज्यांमध्येही पास सेवा सुरू करण्यात आल्याने फायदेशीर ठरत आहे. संबंधित - आता सायबर क्राईमचाही धोका, पैस दिले नाही तर कोरोना पसरवण्याची दिली जातेय धमकी
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या