S M L

साध्वी प्रज्ञासिंह निवडणूक कशी लढणार? ओमर अब्दुल्लांचा सवाल

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांची जामिनावर सुटका झाली. त्यांची तब्येत ढासळल्यामुळे त्यांना जामीन मिळाला. मग त्या निवडणूक कशी काय लढू शकतात, असा सवाल ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे.

Updated On: Apr 18, 2019 04:54 PM IST

साध्वी प्रज्ञासिंह निवडणूक कशी लढणार? ओमर अब्दुल्लांचा सवाल

श्रीनगर, 18 एप्रिल : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून सुटका झालेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. साध्वी प्रज्ञासिंह यांना भोपाळमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्या काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांना त्या टक्कर देत आहेत.

साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीवरून विरोधक टीका करत आहेत. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही साध्वींच्या उमेदवारीबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.

जामिनावर सुटका


मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांची जामिनावर सुटका झाली. त्यांची तब्येत ढासळल्यामुळे त्यांना जामीन मिळाला. मग त्या निवडणूक कशी काय लढू शकतात, असा सवाल ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे.

दहशतवादी कारवायांच्या खटल्यात जी व्यक्ती आरोपी असून जामिनावर बाहेर आहे अशा व्यक्तीला भाजप उमेदवारी कसं काय देऊ शकतं, असा सवाल त्यांनी विचारला आहे. प्रकृती ठीक नसल्यामुळे साध्वींना जामीन दिला गेला आहे. प्रकृतीच्या कारणामुळे त्या तुरुंगात राहू शकत नाहीत, मग निवडणूक कशी काय लढवू शकतात, असंही ओमर अब्दुल्ला म्हणाले.

'जामीन रद्द करा'

Loading...

साध्वी प्रज्ञासिंह यांना मिळालेला जामीन रद्द व्हावा, असी मला अपेक्षा आहे, अशी टिप्पणीही ओमर अब्दुल्ला यांनी केली. ओमर यांनी श्रीनगरमध्ये गुरुवारी मतदान केलं. त्यानंतर त्यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर टीका केली.

भोपाळमधून भाजप शिवराज सिंह किंवा उमा भारती यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार होतं. पण या दोघांनीही नकार दिल्याने प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली.

साध्वी यांच्या अचानक एन्ट्रीमुळे भाजपचे अनेक दिग्गज नेते निराश झाले आहेत. पण भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या सहमतीनेच हा निर्णय झाला आहे, असं स्थानिक नेत्यांना सांगण्यात आलं आहे.

======================================================================================================================================================================

SPECIAL REPORT : 'लाव रे तो व्हिडिओ'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 18, 2019 04:54 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close