Home /News /national /

बिहारचा रणसंग्राम आणि अमेरिकेतील सत्ताबदल! काय आहे या दोन्ही निवडणुकांचा संबंध?

बिहारचा रणसंग्राम आणि अमेरिकेतील सत्ताबदल! काय आहे या दोन्ही निवडणुकांचा संबंध?

सामनाचा अग्रलेख, रितेश देशमुखचं क्रिएटिव्ह तर उमर अब्दुलांचं टिका करणारं ट्वीट! बिहार आणि अमेरिकेच्या निवडणुकीचा काय आहे संबंध?

    मुंबई, 10 नोव्हेंबर: बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या (Bihar Polls Results) आजच्या दिवशी मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा निवडून येतील की राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव मुख्यमंत्री होतील याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्याचवेळी अमेरिकेच्या अध्यक्षपदी जो बायडन आणि उपाध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचा विजय जाहीर झाला आहे. या सगळ्यामुळे बिहारची विधानसभा निवडणूक आणि अमेरिकेची सार्वत्रिक निवडणूक यातील विविध संबंध सोशल मीडियातून व्यक्त होत आहेत. राजकीय गटातटांतही याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. पण याला महत्त्व मिळालं ते शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखामुळे. अमेरिकेतील निकालानंतर भारताने धडा घ्या शिवसेनाचे मुखपत्र असणाऱ्या सामनामध्ये असे म्हटले आहे की, 'खोटी आश्वासनं देणाऱ्या नेत्यांना जनता पराभूत करते हे अमेरिकेच्या निवडणुकीवरून सिद्ध झालं आहे. अमेरिकेत कोव्हिड महामारीहून मोठी समस्या बेरोजगारीची होती. पण ट्रम्प यांनी आपलं अपयश लपवण्यासाठी राजकीय विधानंच केली.' (हे वाचा-कुस्तीपटू योगेश्वर दत्तला काँग्रेसकडून 'धोबीपछाड'? भाजपचा हा उमेदवार पिछाडीवर) बिहारमध्ये एनडीएचं नितीश कुमारांचं सरकार पडणार अशी घोषणाच शिवसेनेने केली आहे. भारतीय संस्कृतीत चुकीच्या लोकांची पाठराखण केली जात नाही पण भारताने ट्रम्प यांच्यासोबत हातमिळवणी करून भारत सरकाने तेच केलं आहे, असे देखील या अग्रलेखात म्हटले आहे. शिवसेनेनी सामन्यातून आपली भूमिका स्पष्ट केली असून त्यात म्हटलंय, ‘भारताने‘नमस्ते ट्रम्प’ म्हटलं पण अमेरिकन जनतेने ‘बाय बाय ट्रम्प’ म्हटलं. तसंच बिहारमध्ये तेजस्वीसमोर पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री नितीशकुमारांसारखे नेते फिके पडल्याचं दिसतं आहे.’ रितेशने जुळवलं बायडन-हॅरिस यांचं बिहार कनेक्शन? अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडिया पोस्टमध्ये बायडन आणि कमला हॅरिस यांच्या इंग्रजी नावांच्या स्पेलिंगचं एकत्रिकरण करून बिहारचं इंग्रजीतलं स्पेलिंग तयार केलं आहे. त्यामुळे अनेक जण यावर चर्चा करायला लागले आणि अमेरिका आणि बिहारचा संबंध जोडायला सुरुवात केली. खरंच बायडन यांचा भारताशी संबंध आहे? अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष असताना बायडन 2013 मध्ये मुंबईत आले होते तेव्हा त्यांनी 1972 च्या एका चिठ्ठीचा उल्लेख केला होता. त्या चिठ्ठीत असा उल्लेख होता की बायडन यांचे पूर्वज भारतीय होते आणि 18 व्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीशी संबंधित होते. 2015 मध्ये ते म्हणाले होते की त्यांच्या पूर्वजानी एखाद्या भारतीय महिलेशी लग्न केलेलं असू शकतं. त्यांना मिळालेल्या त्या चिठ्ठीमागचं सत्य बायडन यांना तपासता आलं नव्हतं. पण त्या वेळी बायडन आडनावाच्या पाच व्यक्ती होत्या अशी माहिती एका पत्रकाराने त्यांना दिली होती. त्यावर गमतीने बायडन असंही म्हटलं होते की, ‘मग मी भारतातही निवडणूक लढवू शकतो.’ उमर अब्दुलांचं ट्वीट चर्चेत दरम्यान नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनीही एक ट्विट करून बिहार अमेरिका संबंधांबद्दल मत व्यक्त केलं होतं. ते म्हणाले होते, ‘बिहार आणि अमेरिकेतील निवडणुकीतील पराभव हा येणाऱ्या काही दिवसांतील वाईट काळाची नांदी असेल. ’ त्यांनी भाजपवर टीका केली होती पण नेटिझन्सने त्यांना टीका केल्याबद्दल सोशल मीडियावर सुनावलं होतं. एकूणात काय तर बिहार आणि अमेरिकेच्या निवडणुकीचा थेट असा काहीही संबंध नाही. पण क्रिएटिव्हिटी आणि सोशल ट्रेंड्स पाहता अशा चर्चा सुरू आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने चर्चांना वाव मिळतो आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Bihar, Bihar Election, Election

    पुढील बातम्या