S M L

कालच्या भारत बंदला राजस्थानात आज प्रत्युत्तर; आमदारांचेच जाळले घर

राजस्थानच्या करौलीमध्ये 5000 लोकांच्या संतप्त जमावानं दोन दलित नेत्यांच्या घरांना आग लावली आहे. जमावाने भाजपा आमदार राजकुमारी जाटव आणि कॉंग्रेसचे माजी आमदार भरोसीलाल जाटव यांच्या घराला आग लावली आहे

Chittatosh Khandekar | Updated On: Apr 3, 2018 08:50 PM IST

कालच्या भारत बंदला  राजस्थानात आज प्रत्युत्तर; आमदारांचेच जाळले घर

 03 एप्रिल:  अॅट्रॉसिटी कायद्यातल्या बदलाविरोधात  दलित संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाचे पडसाद  आज राजस्थानात उमटत आहेत.कालच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज प्रचंड हिंसा करण्यात आली. तसंच अनेक जणांना मारहाणही करण्यात आली.

राजस्थानच्या करौलीमध्ये 5000 लोकांच्या  संतप्त जमावानं दोन दलित  नेत्यांच्या घरांना आग लावली आहे. जमावाने भाजपा आमदार राजकुमारी जाटव आणि कॉंग्रेसचे माजी आमदार भरोसीलाल जाटव यांच्या घराला आग लावली आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने येथे सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे.काल दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार राजस्थानात झाला होता. त्यात 4 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते तर अनेक जण जखमी झाले होते. याचा विरोध करण्यासाठी अनेक लोकं रस्त्यावर उतरले होते.  काल हिंसाचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी ते करत होते. पण नंतर हा जमाव आक्रमक झाला त्यांनी दलित विद्यार्थी   बहुसंख्य असलेली शाळा जाळली. अनेक मुलं जखमी झाले. करौली जिल्ह्यातील हिंदौन शहरात आता संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

दरम्यान उरलेल्या राजस्थानात मात्र परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर येते आहेत. भारत बंदमध्ये हिंसाचार करणाऱ्यांवर एकूण 172गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 3, 2018 08:50 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close