Home /News /national /

झळा आणि काहिली! यंदा महाराष्ट्राने राजस्थानशी केली बरोबरी, IMD नुसार ही दोन राज्य सर्वाधिक उष्ण

झळा आणि काहिली! यंदा महाराष्ट्राने राजस्थानशी केली बरोबरी, IMD नुसार ही दोन राज्य सर्वाधिक उष्ण

Heat Wave : पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, झारखंड, अंतर्गत ओडिशा, बिहार, छत्तीसगड, गुजरात आणि तेलंगणा येथे 3 मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहील.

  नवी दिल्ली, 29 एप्रिल : या उन्हाळ्यात सतत उष्णतेच्या लाटेमुळे महाराष्ट्र आणि राजस्थानला सर्वाधिक उष्णतेचा सामना करावा लागत आहे. दोन्ही राज्यं मार्चपासून देशात चारपैकी तीन उष्णतेच्या लहरींच्या प्रभावाखाली आली आहेत. या राज्यांमध्ये विशेषतः विदर्भ आणि पश्चिम राजस्थानमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून कमाल तापमान 44 अंश सेल्सिअसवर राहिलं आहे, असं भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अधिकार्‍यांनी सांगितलं. यामुळे उष्णतेच्या लाटांमुळे ही राज्यं या वर्षीच्या उन्हाळ्यात जगातील सर्वात उष्ण प्रदेशांपैकी एक बनली आहेत. चंद्रपूर, ब्रह्मपुरी, अकोला, जळगाव, बारमेर, जैसलमेर, बिकानेर येथे एप्रिल महिन्यातील विक्रमी तापमान नोंदवलं गेलं आहे. सध्याच्या उष्णतेच्या लाटेच्या काळात, महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसांपैकी चार दिवसांत देशातील सर्वोच्च कमाल तापमान नोंदवलं गेलं. ते (अंश सेल्सिअसमध्ये) - चंद्रपूर (21 एप्रिलला 45.4), वर्धा (25 एप्रिलला 45) आणि जळगाव (28 आणि 23 एप्रिलला अनुक्रमे 45.6 आणि 44). 24 आणि 26 एप्रिल या दोन दिवसांसाठी, देशातील सर्वात उष्ण ठिकाण म्हणून नोंद झालेल्या पश्चिम राजस्थानमधील बारमेर येथे (अनुक्रमे 44 आणि 45.1) तापमान होतं. तर, पूर्व उत्तर प्रदेशातील फतेहगढ (22 एप्रिल रोजी 43.8) आणि पश्चिम मध्य प्रदेशातील राजगढ (27 एप्रिल रोजी 45.6) येथे सर्वात उष्ण स्थानांची नोंद झाली. हे वाचा - Drugs :भारतीय वंशाच्या तरुणासाठी सिंगापूरमध्ये निदर्शनं, लोक उतरली रस्त्यावर “देशात पाऊस पाडून वाढणारं तापमान कमी करू शकेल अशी कोणतीही अनुकूल हवामान प्रणाली मोठ्या प्रमाणात नाही. उत्तर भारतातील उष्णतेच्या लाटेच्या झोनमधून उष्ण आणि कोरडे उत्तरेकडील वारे महाराष्ट्रात, विशेषत: विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्र प्रदेशात प्रवेश करत आहेत. याच्यामुळं इथलं दिवसाचं तापमान सामान्यपेक्षा खूप जास्त नोंदवलं जात आहे,” असं प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथील वरिष्ठ अधिकाऱ्यानं शुक्रवारी सांगितलं. गेल्या आठवड्यात भारतातील पावसाची तूट उणे 61 टक्क्यांपर्यंत वाढली. पावसाच्या कमतरतेमुळे मुख्यत्वे वायव्य भारत (उणे 100 टक्के) आणि मध्य भारतात (उणे 85 टक्के) हे घडलं आहे. हे वाचा - russia ukraine war : रशियाने डॉल्फिन्सना दिलं खास प्रशिक्षण, अशा प्रकारे करताय नौदलाचं संरक्षण
   शनिवारी पंजाब आणि राजस्थानमध्ये धुळीचं वादळ वाहू शकतं. तर, उत्तराखंडमध्ये 2 मे पर्यंत गारपीट होऊ शकते.
  दरम्यान, IMD ने पश्चिम राजस्थान आणि मध्य प्रदेशसाठी 2 मे पर्यंत "ऑरेंज" अलर्ट (ज्याचा अर्थ "be ready") जारी केला आहे. म्हणजेच 2 मे पर्यंत तीव्र उष्णतेच्या लाटेच्या स्थितीसाठी तयार राहण्याशिवाय पर्याय नाही. 2 मे पर्यंत पंजाब, हरियाणामध्ये उष्णतेची लाट कायम राहील. तर, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, झारखंड अंतर्गत ओडिशा, बिहार, छत्तीसगड, गुजरात आणि तेलंगणा इथे ती 3 मे पर्यंत राहील.
  Published by:Digital Desk
  First published:

  Tags: Climate change, Heat, IMD, IMD FORECAST, Rise in temperatures

  पुढील बातम्या