धक्कादायक! कोरोना चाचणीअभावी रुग्णालयाने नाकारले उपचार, 8 महिन्यांच्या गर्भवतीचा मृत्यू

धक्कादायक! कोरोना चाचणीअभावी रुग्णालयाने नाकारले उपचार, 8 महिन्यांच्या गर्भवतीचा मृत्यू

रुग्णालयात उपचारासाठी गेल्यावर महिलेला आधी कोरोना चाचणी करण्यास सांगितले

  • Share this:

बदायू, 9 जुलै : सध्या देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. अशातच रुग्णालयांवर अतिरिक्त भार आला आहे. मात्र दुसरीकडे कोरोनाव्यतिरिक्त इतर आजार असणाऱ्यांनाही त्रासाचा सामना करावा लागत आहे. त्याशिवाय या काळात गर्भवती महिलांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

अशातच उत्तर प्रदेशातील बदायू येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बदायूतील एका गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. आम्ही त्यांना उपचारासाठी हजरतपुरहून आणले होते. मात्र रुग्णालय प्रशासनाने त्यांना तपासले नाही आणि कोरोनाची चाचणी करुन आणण्यास सांगितले. मात्र जोपर्यंत महिलाची चाचणी करण्यात आली त्यापूर्वीच महिलेचा मृत्यू झाला.

यावर महिला अधीक्षकांनी सांगितले की महिला हैद्राबादहून हजरतपुर आली होती. हा त्यांचा 5 वा मुलगा आहे. महिला 8 महिन्यांची गर्भवती होती. त्यांचं यापूर्वी अल्ट्रासाऊंड आणि कोणत्याही प्रकारची चाचणी झाली नव्हती. यासाठी जिल्हा रुग्णालयाने त्यांना कोरोना चाचणी करण्यास सांगितले. यादरम्यान महिलेचा मृत्यू झाला, अशी माहिती रुग्णालयाचे सीईओ यशपाल सिंह यांनी दिली. या घटनेनंतर कुटुंबीयांनी राग व्यक्त केला आहे. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

 

Published by: Meenal Gangurde
First published: July 9, 2020, 8:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading