रुग्णालयातील शवगृह भरले, आता मृतदेह ठेवण्यासाठी अशी केली जातेय व्यवस्था

रुग्णालयातील शवगृह भरले, आता मृतदेह ठेवण्यासाठी अशी केली जातेय व्यवस्था

देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यात रुग्णांलयांवर ताण येत आहे. त्यामुळे अनेकदा रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 31 मे : कोरोनाव्हायरस दिल्लीसह संपूर्ण देशात वाढत आहे. दरम्यान, राजधानी दिल्लीतील राम मनोहर लोहिया हॉस्पिटल (आरएमएल) च्या शवगृहात (Morgue) मृतदेहासाठी जागा शिल्लक नसल्याची बातमी समोर आली आहे. आरएमएल रुग्णालयाने रेफ्रिजरेटर कंटेनरमध्ये कोरोनाव्हायरस संसर्गातून मृत व्यक्तींचे मृतदेह ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हे कंटेनर स्मशानभूमीजवळ ठेवले आहेत आणि एकाच वेळी त्यामध्ये 12 मृतदेह ठेवता येते.

आरएमएलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीनाक्षी भारद्वाज यांनी वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना सांगितले की, बर्‍याच काळापासून कोरोनाच्या रूग्णांवर येथे उपचार केले जात आहेत. कोरोना संसर्गामुळे 172 जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला.

हॉस्पिटलचे शवगृह अपुरे

त्या म्हणाल्या की, रुग्णालयाचे शवगृह लहान आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून क्षमता वाढविण्यासाठी रेफ्रिजरेटर कंटेनर खरेदी केले आहेत. कोविड -19 रूग्णांच्या मृतदेहांव्यतिरिक्त, रूग्णालयात दाखल झालेले इतरही आजारांनी मरण पावले आहेत. कोविड – 19 ने संक्रमित 1412 रूग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील बहुतेकांना बरे झाल्यानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

दिल्लीत कोरोना विषाणूचे प्रमाण वाढत आहे. गेल्या 24 तासांत 1163 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. रुग्णांची संख्याही 17 हजारांच्या पुढे गेली आहे. 7 हजारांहून अधिक लोक देखील बरे झाले आहेत.

15 दिवसांत 8 हजाराहून अधिक प्रकरणे

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मते, गेल्या 15 दिवसात 8500 कोरोना प्रकरणे समोर आली आहेत. परंतु केवळ 500 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाकीच्यांवर घरी उपचार केले जात आहेत. केजरीवाल म्हणाले की, सोमवारपासून लोकांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. यावर उपाययोजना म्हणून App ची निर्मिती करण्यात आली आहे.

हे वाचा-जानेवारीत झाला होता हार्दिक पांड्याचा साखरपुडा; लहानग्या पाहुण्याची दिली News

 

 

First published: May 31, 2020, 9:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading