शक्ति सिंह, प्रतिनिधी
कोटा, 23 मार्च : आधुनिक वाहनांमुळे प्रवासाची साधनं फार बदलली आहे. पण घोडेस्वारीचे वेगळेच महत्त्व आहे. घोडा हे आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे. घोडा हा स्वामी भक्त असतो. महाराणा प्रताप यांचा चेतक आणि महाराणी लक्ष्मीबाई यांचा घोडा ही स्वामी भक्तीची उदाहरणे आहेत.
त्याच वेळी, मारवाडी घोडे जगातील सर्वोत्तम घोड्यांच्या जातींपैकी एक मानले जातात. महाराणा प्रतापचा चेतक हा देखील मारवाडी जातीचा घोडा होता. हा युद्धात वापरला जाणारा घोडा मानला जातो. मात्र, आज कोटाच्या सरपंचाबद्दल जाणून घेऊयात. जे आपल्या घोड्यांच्या छंदासाठी प्रसिद्ध आहेत.
कोटाजवळील तिरथ गावचे सरपंच रणवीर सिंग अटवाल यांचीही या परिसरात स्वतःची ओळख आहे. लहानपणापासूनच त्यांना घोड्यांची खूप आवड होती. वयानुसार, हा छंद इतका वाढला आहे की त्याच्याकडे 1, 2 नाही तर 50 हून अधिक घोडे आहेत. यामध्ये 9 ते 10 स्टॅलियन घोडे देखील आहेत. सरपंचाच्या शेतातील घोड्यांची काळजी घेणारे भंवर ज्ञानेंद्र सिंह यांनी सांगितले की, हे घोडे पुष्करमध्ये होणाऱ्या पशु मेळ्यात नेले जातात. एखादा चांगला घोडा आवडला तर ते तो घोडा खरेदी करतात.
रणवीर सिंग अटवाल यांच्याकडे 15 लाख ते 40 लाखांपर्यंतचे घोडे आहेत. त्यामध्ये महाराजा, नुक्रा, दिलबाग, रानिया, अभोर, शिवराज, तुफान या प्रसिद्ध घोडे आहेत. रणवीर सिंग यांचा ऑल इंडिया टॉप 10 मध्ये हॉर्स स्टीड फार्ममध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यांना चांगल्या जातीचे घोडे गोळा करण्याचा छंद आहे. हडोतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात घोडे इतर कोणाकडे नाहीत, असेही सांगितले जाते.
भगवान बुद्धांची अनोखी मूर्ती, चोरी करणे अशक्यच, हे आहे महत्त्वाचं कारण VIDEO
काळ बदलत गेला आणि ...
एक काळ असा होता की लोक गाई, म्हशी, बकऱ्यांसोबत उंट आणि घोडे पाळत असत. दरम्यान, मध्यंतरीच्या दशकात, लोकांचा घोडा आणि उंट पालनाकडे असलेला रस खूपच कमी झाला होता. पण आता फॅशन आणि पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावाने लोक पुन्हा स्टड फार्म सुरू करत आहेत. हा व्यवसाय केवळ खेड्यापाड्यातच नाही तर शहरांमध्येही फायदेशीर आहे. शहरांमध्ये घोडेस्वारीचा प्रमाण वाढला आहे. आज युवक स्वत: पुढे येऊन घोडेस्वारीमध्ये रस दाखवत आहेत. शाळेत मुलांना घोडेस्वारीही शिकवली जाते. तसेच सोशल मीडियामुळे आता हे घोडे खूप प्रसिद्ध होत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.