Home /News /national /

कोयत्याने वार करून केले अक्षरश: तुकडे, तरुणाच्या हत्येचा भयंकर VIDEO

कोयत्याने वार करून केले अक्षरश: तुकडे, तरुणाच्या हत्येचा भयंकर VIDEO

या टोळक्याने एकाच वेळी कोयत्याने सपासप वार करत इतका भीषण हल्ला चढवला की, या तरुणाला आपला जीव वाचवण्यासाठी एका सेंकदाचा वेळ सुद्धा मिळाला नाही

    चेन्नई, 28 फेब्रुवारी : तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये एका तरुणाच्या हत्येची अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. 7 ते 8 तरुणांनी एका 28 वर्षीय तरुणावर तलवारी आणि कोयत्याने सपासप वार केले. यात त्याचा जागीच जीव गेला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय तरुण हा रस्त्यावर फोनवर कुणाशी तरी बोलत होता. त्याचवेळी 7 ते 8 जणांची गँग तलवारी, कोयते घेऊन धावत आली आणि या तरुणावर एकच हल्ला चढवला. या टोळक्याने एकाच वेळी कोयत्याने सपासप वार करत इतका भीषण हल्ला चढवला की, या तरुणाला आपला जीव वाचवण्यासाठी एका सेंकदाचा वेळ सुद्धा मिळाला नाही. मृत तरुण खाली पडल्यानंतर या टोळीने  सपासप वार करून त्याच्या चेहऱ्याचे अक्षरश: तुकडे करून टाकले. अवघ्या 29 सेंकदाचा हा सीसीटीव्ही व्हिडिओ आहे. ही घटना नेमकी का आणि कशामुळे घडले हे मात्र, अद्याप समोर येऊ शकलं नाही. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या आधारे या टोळीचा शोध घेतला जात आहे. गर्दीच्या असलेल्या रस्त्यावर फिरतेय शीर नसलेली व्यक्ती, धक्कादायक VIDEO VIRAL सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात काही मजेशीर तर काही धक्कादायक असे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ भीतीदायक असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. गर्दीच्या रस्त्यात एक माणूस चालत आहे पण त्याचं डोकं दिसत नाही. अशा या डोकं नसलेल्या माणसाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे याची माहिती मिळाली नाही. रस्त्यावर ट्राफीक दिसत आहे आणि एक व्यक्ती फिरताना दिसतो. यात त्याचं डोकं मात्र दिसत नाही. त्या व्यक्तीच्या हातात एक लाल रंगाची बॅगही दिसत आहे. लोकांची ये जा असलेल्या ठिकाणी एखादी व्यक्ती डोकं नसताना चालते तरीही त्यांची काहीच धक्कादायक प्रतिक्रिया नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. रस्त्यावरून कोणीतरी डोकं नसलेला माणूस फक्त त्याचं धड चालत आहे हे पाहिलं तरी अनेकांना धक्का बसेल. सगळे त्याच्याभोवती जमा होतील. पण या व्हिडिओत असं काहीच होत नाही. त्यामुळं हा व्हिडिओ एडिटेड आहे की काय अशीही शंका येते. फेबरी एडिक्सन नावाच्या यूट्यूब चॅनेलने हा व्हिडिओ शेअर केला आहे. टिकटॉक, फेसबुक आणि ट्विटरवरसुद्धा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे ते समोर आलेलं नाही. तसंच संबंधित व्यक्तीने ट्रिक वापरल्याचं नाकारता येत नाही. पण तरीही गर्दीच्या ठिकाणी अशी ट्रिक वापरली तरी लोक त्यावर काहीच प्रतिक्रिया देत नसल्यानं व्हिडिओ एडिटेड असण्याची शक्यता आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या