मराठी बातम्या /बातम्या /देश /Accident CCTV : भरधाव Audi कारने नागरिकांना चिरडले, अंगावर काटा आणणारा अपघाताचा LIVE VIDEO

Accident CCTV : भरधाव Audi कारने नागरिकांना चिरडले, अंगावर काटा आणणारा अपघाताचा LIVE VIDEO

भरधाव ऑडी कारने अनेकांना चिरडले, अंगावर काटा आणणारा अपघाताचा LIVE VIDEO

भरधाव ऑडी कारने अनेकांना चिरडले, अंगावर काटा आणणारा अपघाताचा LIVE VIDEO

Horrific Accident CCTV : भरधाव गाडीने रस्त्यावरील नागरिकांना चिरडल्याची घटना घडली असून या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

जयपूर, 10 नोव्हेंबर : एका भरधाव ऑडी कारने अनेकांना चिरडल्याची (speeding audi car hits people) धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (Horrific accident caught in CCTV) झाली आहे. या अपघाताचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर 9 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात राजस्थानमधील जोधपूर (Jodhpur Rajasthan) येथे घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या भरधाव ऑडी कारने नागरिकांना चिरडले ती गाडी राजस्थानमधील जयपूर येथील रजिस्ट्रेशनची असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताचा व्हिडीओ पाहून अक्षरशः अंगावर काटा येतो. अपघाताचा सीसीटीव्ही पाहून अपघात किती भीषण होता याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. मंगळवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

राजस्थानमधील जोधपूर येथे मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. जोधपूर शहरात असलेल्या एम्स रोडवर हा अपघात झाला आहे. सीसीटीव्ही व्हिडीओत दिसत आहे की, एक भारधाव ऑडी कार रस्त्यावरील नागरिकांना चिरडते तसेच अनेक दुचाकी वाहनचालकांनाही जोरदार धडक देते. यानंतर शेजारील झोपड्यांमध्ये ही गाडी शिरते.

हा अपघात इतका भीषण होता की, ऑडी कारने धडक दिल्यावर अनेक दुचाकी आणि माणसे अक्षरशः उडताना दिसत आहेत. या अपघातानंतर तात्काळ स्थानिकांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. जखमींवर जोधपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आरोपी ऑडी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आर्थिक मदतीची घोषणा केली. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी तात्काळ चौकशी करुन कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अंगावर काटा आणणाऱ्या या अपघाताचा सीसीटीव्ही सोशल मीडियातही जोरदार व्हायरल होत आहे.

भोपाळमध्ये भरधाव कारने दोघांना चिरडले

ऑक्टोबर महिन्यात भोपाळमध्ये भीषण अपघात झाला होता. दुर्गा मातेच्या विसर्जन मिरवणुकीत एक भरधाव कार शिरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोपाळमध्ये शनिवारी दुर्गा मातेची मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी हा प्रकार घडला आहे. भरधाव कार मिरवणुकीत शिरल्याने दोघे जण चिरडले गेले. या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत तर दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. अंगावर काटा आणणारी ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

First published:

Tags: Accident, Cctv footage, Rajasthan