'सैराट' सारखी आणखी एक घटना, वडिलांनीच केली गर्भवती मुलीची हत्या

'सैराट' सारखी आणखी एक घटना, वडिलांनीच केली गर्भवती मुलीची हत्या

चेन्नईमध्ये 'सैराट' या चित्रपटातल्यासारखीच एक घटना घडली आहे. आंतरजातीय विवाह केला म्हणून एका दाम्पत्याला ठार करण्यात आलं. धक्कादायक बाब म्हणजे ही मुलगी दोन महिन्यांची गर्भवती होती.

  • Share this:

चेन्नई, 5 जुलै : चेन्नईमध्ये 'सैराट' या चित्रपटातल्यासारखीच एक घटना घडली आहे. आंतरजातीय विवाह केला म्हणून एका दाम्पत्याला ठार करण्यात आलं. धक्कादायक बाब म्हणजे ही मुलगी दोन महिन्यांची गर्भवती होती.

पाच जणांच्या गँगने येऊन या दोघांवर प्राणघातक हल्ला केला. या घटनेची चौकशी केल्यानंतर समजलं की या मुलीच्या वडिलांनीच या दोघांना मारण्याचा कट रचला. त्यांनी तशी कबुलीही दिली.

टी. सोलाइराज आणि ए. ज्योती यांनी प्रेमविवाह केला. कामाच्या ठिकाणी या दोघांची ओळख झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण ज्योतीच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता.

हे दोघं जण वेगवेगळ्या जातीतले असल्याने त्यांनी लग्न का केलं, असं ज्योतीच्या घरच्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे ते या दोघांवर रोष धरून होते.

उत्पन्न 11.75 लाख असलं तरी टॅक्स लागणार नाही, त्यासाठी अशी करा गुंतवणूक

टी. सोलाइराज याचं एका खोलीचं छोटंसं घर होतं. या दोघांचं लग्न झाल्यानंतर त्याची आई आणि बहीण नातेवाईकांकडे जाऊन राहत असत. त्यामुळे घरात फारसं कुणीच नसे. याचाच फायदा घेऊन पाच जणांची एक टोळी त्यांच्या घरात घुसली आणि त्यांनी या दोघांची हत्या केली.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर सोलाइराजची आई आणि बहीण घरी आली तेव्हा त्यांना या दोघांचे मृतदेह घरात दिसले. त्यांनी आरडाओरडा करून शेजाऱ्यांना जागं केलं त्यानंतर घडलेला प्रकार समोर आला.

पोलीस तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी दोघांचे मृतदेह हॉस्पिटलमध्ये पोस्ट मार्टेमसाठी पाठवले. या प्रकरणी सोलाइराज याच्या नातेवाईकांनी ज्योतीच्या कुटुंबीयांवर थेट खुनाचा आरोप केला आहे. त्यांना याबदद्ल कठोर शिक्षा करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

===================================================================================================

दुचाकी घसरली आणि अनर्थ घडला...अपघाताचा थरारक VIDEO समोर

First published: July 5, 2019, 8:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading