हनिप्रीत आणि 35 आरोपींविरोधात पंचकुला कोर्टात आज सुनावणी

हनिप्रीत आणि 35 आरोपींविरोधात पंचकुला कोर्टात आज सुनावणी

हनिप्रीतसह अन्य 15 आरोपींविरोधात आज पंचकुला कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यांच्यावरील आरोप निश्चित केले जाणार आहेत.

  • Share this:

11 जानेवारी : बलात्कारी बाबा गुरमीत राम रहीमला 25 ऑगस्ट रोजी बलात्काराच्या आरोपाखाली न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर हरियाणामधील पंचकुला येथे हिंसा भडकली होती. या हिंसेत 35 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. राम रहीमची दत्तक मुलगी हनिप्रीतने हिंसा भडकावल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या चौकशीत तिने आपल्यावरील आरोप मान्यही केले होते.

याचप्रकरणी हनिप्रीतसह अन्य 15 आरोपींविरोधात आज पंचकुला कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यांच्यावरील आरोप निश्चित केले जाणार आहेत. दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटबाबत आज सुनावणीत चर्चा होणार आहे. दरम्यान हनीप्रीतला न्यायालयात हजर करण्यात आलं आहे.

पंचकुलामध्ये 25 ऑगस्टला राम रहीम याला दोन साध्वींवर बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरविल्यानंतर हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात 34 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. तसेच, हिंसाचारादरम्यान, जमावाने 100 हून अधिक गाड्यांना आग लावली होती आणि मीडियावर हल्ला केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 11, 2018 12:26 PM IST

ताज्या बातम्या