हनीप्रीत हरियाणा पोलिसांना शरण

हनीप्रीत हरियाणा पोलिसांना शरण

हनीप्रीतवर दंगे भडकवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .बाबा राम रहिम यांना शिक्षा सुनावली त्यादिवशी भडकलेल्या दंग्यांमागे हनीप्रितची महत्त्वाची भूमिका होती असं सांगितलं जातंय.

  • Share this:

पंचकुला,03 ऑक्टोबर: गेले अनेक दिवस बेपत्ता असलेली बाबा राम रहिम यांची मानस कन्या हनीप्रीत ही  हरयाणा पोलिसांना शरण आली आहे.  ती  कुणाच्या कस्टडीत राहणार यावरून पंजाब आणि हरियाणा पोलिसांमध्ये वाद चालू होते पण अखेर तिची कस्टडी हरयाणा पोलिसांना देण्यात आली आहे.

हनीप्नीत पोलिसांना शरण येणार असल्याची माहिती आधीच  हनीप्रीतच्या जवळच्या सूत्रांनी दिली आहे.  ज्यादिवशी बाबा राम रहिम यांना शिक्षा सुनावण्यात आली त्यादिवशीपासून हनीप्रीत बेपत्ता होती.

हनीप्रीत ही बाबा राम रहिम यांची मानस कन्या असल्याचं सांगितलं जातं. तिने काही दिवसांपूर्वी दिल्ली हायकोर्टात जामीनाची याचिका दाखल केली होती. दिल्ली कोर्टाने ती बरखास्त करत पंजाब हायकोर्टात याचिका दाखल करण्याची सूचना दिली होती. हनीप्रीतवर दंगे भडकवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .बाबा राम रहिम यांना शिक्षा सुनावली त्यादिवशी भडकलेल्या दंग्यांमागे हनीप्रितची महत्त्वाची भूमिका होती असं सांगितलं जातंय.

दरम्यान बाबा राम रहिम आणि हनीप्रीतमध्ये अवैध संबंध होते असा आरोप हनीप्रीतच्या पतीने केला होता. बाबा राम रहिमसोबत तिने सिनेमात कामही केलं होतं.

First published: October 3, 2017, 11:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading