खूशखबर! 'या' Honda कारवर 4 लाखांपर्यंत मोठी सूट, काय आहे ऑफर जाणून घ्या

खूशखबर! 'या' Honda कारवर 4 लाखांपर्यंत मोठी सूट, काय आहे ऑफर जाणून घ्या

होंडा कंपनी ग्राहकांसाठी कायमच वेगवेगळ्या सुविधा आणि ऑफर्स देत असते. विक्री वाढवण्यासाठी होंडा कंपनी चारचाकी गाड्यांवर एक खास ऑफर घेऊन आली आहे.

  • Share this:

मुंबई, 12 सप्टेंबर: होंडा कंपनी ग्राहकांसाठी कायमच वेगवेगळ्या सुविधा आणि ऑफर्स देत असते. विक्री वाढवण्यासाठी होंडा कंपनी चारचाकी गाड्यांवर एक खास ऑफर घेऊन आली आहे. यामध्ये वॉरेंटी वाढवणं, इंश्युरन्स, अॅक्सिसरीजवर 4 लाखांपर्यंत कॅश डिस्काऊंट ग्राहकांना देणार आहे.

ऑटो इंडस्ट्रीमध्ये आलेल्या मंदीनंतर गाडी घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्यानं त्याचा मोठा फटका ऑटो इंडस्ट्रीला बसला आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कार कंपन्या वेगवेगळ्या पद्धतीच्या ऑफर्स ग्राहकांना देत आहेत. विक्री वाढवणे आणि ग्राहकांना खूश करण्यासाठी होंडा कंपनीने काही खास ऑफर्स आणल्या आहेत.

Honda Amaze (होंडा अमेझ)

कॉम्पैक्ट सिडान सेगमेंट होंडाची सगळ्यात लोकप्रिय असणारी ही कार. Honda Amaze वर 53 हजार रुपयांपर्यंत ग्राहकांना सूट दिली जाणार आहे. यामध्ये मेन्टेनेन्स प्रोग्राम्स आणि एक्सटेंडेंड वॉरंटी देणार आहे.1.2 पेट्रोल आणि 1.5 डिझेल इंजनमध्ये होंडा अमेझ ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.

Honda City

ही कार होंडा कंपनीत सगळ्यात लोकप्रिय असणारी कार म्हणून ओळखली जाते. ही कार मिडसाइज सिडान सेगमेंटमधील सगळ्यात लोकप्रिय गाडी आहे. या कारवर जवळपास 70 हजार रुपयांपर्यंत बेनिफिट्स आणि डिस्काऊंट तुम्हाला मिळू शकतात.

Honda WR-V

Honda WR-V कारवर जवळपास 55 हजार रुपयांचा डिस्काऊंट मिळणार आहे. या गाडीच्या सर्व वेरिएंट्सवर ही ऑफर होंडा देत आहे.ही गाडी पाहताक्षणी तुम्ही तिच्या प्रेमात पडता एवढी सुंदर आहे. ही कार तुम्हाला कन्फर्ट आणि SUVसारखा फील देते.

Honda Civic

एकेकाळी सगळ्यात जास्त विकली जाणारी कार म्हणून होंडा सिविक अशी ओळख होती. जवळपास होंडा सिविक कारवर कंपनीकडून 85 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे.

बाजारात Hyundai Elantra आणि Skoda Octavia गाडीला टक्कर देणारी कार म्हणून होंडा सिविकची वेगळी ओळख आहे.

Honda-BRV

होंडाची आणखी एक मोठी शानदार कार म्हणजे Honda-BRV. या कारवरही कंपनी नव्या ऑफर्स घेऊन आली आहे. 7-सीटर कार SUV पेक्षा ही MPVचा फील ही कार जास्त देत असल्यानं ह्या कारची मागणी घटल्याचा एक अंदाज व्यक्त केला जात आहे. ह्या कारच्या वेरिएंट्सवर कंपनी जवळपास 1.20 लाख रुपये बेनिफिट्स आणि ऑफर्स देत आहे.

Honda CR-V

5 व्या जनरेशनची Honda CR-V कार भारतात मागच्या वर्षी लॉन्च करण्यात आली. मात्र कारला तितकी मागणी बाजारात न मिळल्यानं आता कंपनी या कारवर सर्वाधिक म्हणजेच 4 लाखांपर्यंतचा कॅश डिस्काऊंट देत आहे. Honda CR-V 1.6-लीटर आणि 2.0-लीटर इंजनसोबत येत आहे. 120hp आणि 154hp पावर देत आहे.

होंडा कंपनीच्या कार घेणाऱ्या ग्राहकांसाठी ही खूशखबर जरी असली तरी ही ऑफर कधीपर्यंत आहे याबाबत कंपनीने कोणतीही माहिती उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे अधिक माहितीसाठी होंडाच्या जवळच्या स्टोरला भेट द्यावी.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

VIDEO: आभाळ भरलं होतं तू येताना, डोळे भरून आले तू जाताना!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2019 01:27 PM IST

ताज्या बातम्या