लक्षणं नसलेल्या कोरोनाबाधितांवर घरी करावा उपचार? तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

देशात कोरोनाचा (coronavirus) हाहाकार वाढत आहे. रोज कोरोना रुग्णांचे आकडे रेकॉर्ड ब्रेक करत आहेत. भारतात 5.28 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. पण या सगळ्यात, कोरोनाची काही नवीन लक्षण समोर आल्यामुळे आरोग्य विभागाच्या अडचणी वाढल्या आहेत.

ज्यांना लक्षण नाही अशांसाठीही तज्ज्ञांनी कसा उपचार व्हायला हवा याबाबत सांगितले आहे.

  • Share this:
    बंगळुरू, 1 जुलै : देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने 6 लाखांचा टप्पा पार केला आहे. त्यातही कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये लक्षण असलेली व लक्षणांविरहित असे दोन प्रकार दिसून येत आहे. ज्यांना लक्षणं आहेत त्यांनी रुग्णालयातून उपचार घेणं गरजेचं असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर ज्यांना लक्षण नाही अशांसाठीही तज्ज्ञांनी कसा उपचार व्हायला हवा याबाबत सांगितले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांनी बुधवारी सांगितले की लक्षण नसलेल्या किंवा कमी लक्षण असलेल्या रुग्णांनी घरातून उपचार घेणं उपयुक्त आहे. यामुळे रुग्णालयांवरील ओझे कमी होईल. हे वाचा-चिनी अॅप्सवरील बंदीनंतर अमूल गर्लनेही दिला संदेश, म्हणाली... येडियुरप्पा यांनी राज्यातील कोविड - 19 च्या व्यवस्थापनाच्या संदर्भात वैद्यकीय तज्ज्ञांची बैठक बोलावली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यातील कोविडच्या उपचार व व्यवस्थापनासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे व रणनीती आणि त्यावरील अंमलबजावणी यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. लवकरच सरकार या दिशेने मार्गदर्शक सूचना जारी करेल. येडियुरप्पा म्हणाले, "बहुतेक तज्ज्ञांचे मत आहे की कोरोनाव्हायरस (कोरोनाव्हायरस) ची लक्षणे नसलेल्या रूग्णांवर घरी उपचार करणे योग्य ठरेल, कारण यामुळे रुग्णालयांवरील ओझे कमी होईल." हे वाचा-या महिलेने रचला इतिहास; पाकिस्तानी सैन्याच्या लेफ्टनंट जनरल पदावर नियुक्ती येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, गंभीर अवस्थेत आणि आधीच इतर कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांच्या उपचाराकडे लक्ष देण्याचा सल्ला देण्यात आला होता. या बैठकीला मनिपाल हॉस्पिटलचे डॉ. सुदर्शन बल्लाळ, स्पार्स हॉस्पिटलचे डॉ. शरण पाटील, फोर्टिस हॉस्पिटलचे डॉ. विवेक जावळी आणि पब्लिक हेल्थ फाउंडेशनचे डॉ. गिरधर बाबू यांच्यासह इतर उपस्थित होते. लक्षणं नसल्यास त्या रुग्णाला निरीक्षणाखाली घरी उपचार केले जाऊ शकतात. डॉक्टरांनी दिलेली औषधं योग्य पद्धतीने, पुरेसा व्यायाम व चांगला आहार घेतल्यासही रुग्ण लवकर बरा होऊ शकतो.   संपादन - मीनल गांगुर्डे
    First published: