गृहमंत्रालयाने काश्मीरविषयी दिली महत्त्वाची बातमी; युद्धबंदीचं उल्लंघन वाढलं पण....

गृहमंत्रालयाने काश्मीरविषयी दिली महत्त्वाची बातमी; युद्धबंदीचं उल्लंघन वाढलं पण....

देशाच्या सुरक्षेसाठी दहशतवादी हल्ले नेहमीच धोकादायक असतात. त्याबाबत एक दिलासादायक बातमी आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी : मागील तीन वर्षात जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-kashmir) युद्धबंदीचं उल्लंघन (ceasefire violation) करण्याच्या घटना वाढल्या आहेत. मात्र दहशतवादी हल्ल्यांची (terrorist attack) संख्या कमी झाली आहे. याबाबतची माहिती गृहमंत्रालयानं (ministry of home affairs) मंगळवारी दिली आहे.

गृहमंत्रालयानं 2018, 2019 आणि 2020 मध्ये झालेल्या युद्धबंदीच्या उल्लंघनाची आकडेवारी सादर केली आहे. याशिवाय मंत्रालयाकडून शेतकरी आंदोलन, नक्षलवाद यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती दिली गेली.

गृहमंत्रालयानं सादर  आकडेवारीनुसार, 2020 मध्ये युद्धबंदी उल्लंघनाचे 5133 प्रकरणं समोर आली. यात 22 सामान्य नागरिकांचे बळी गेले होते. सोबतच यात सुरक्षादलाचे 24 जवान शहीद झाले होते. आणि 126 जखमी झाले होते. 2019 मध्ये युद्धबंदी उल्लंघनाच्या 3479 घटना घडल्या. यात 18 सामान्य नागरिक ठार झाले आणि 19 जवान शहीद झाले. 2018 साली युद्धबंदी उल्लंघनाच्या 2140 घटना घडल्या.

याशिवाय 2018 मध्ये 614 दहशतवादी हल्ले झाले. यात 39 नागरिक (citizens) मारले गेले. यात 91 जवान शहीद झाले. 2020 मध्ये दहशतवादी हल्ले खूप कमी झाले होते. त्यांची संख्या 244 होती. यात सुरक्षादलाचे 62 जवान शहीद (Shaheed jawan) झाले होते. 37 सामान्य नागरिक यात मारले गेले.

सुरक्षादलांनी 2020 मध्ये 21 दहशतवाद्यांना मारलं. 2018 मध्ये हा एकदा 257 आणि 2019 मध्ये 157 इतका होता. तीन वर्षात सैन्यातील 305 जवान शहीद झाले.

गृहमंत्रालयानं सांगितलेल्या आकड्यांनुसार, युद्धबंदी उल्लंघन आणि दहशतवादी हल्ल्यात सर्वाधिक मृत्यू 2018 या वर्षात झाले. यादरम्यान युद्धबंदी उल्लंघनात एकूण 59 जीव गेले. दहशतवाद्यांमुळे 130 लोकांना आपला जीव गमवावा लागला. मात्र 2020 मध्ये या दोन्ही प्रकारच्या घटनांवर बऱ्यापैकी नियंत्रण आणलं गेलं. सैन्यानं तीन वर्षात 635 दहशतवादी मारले. युद्धबंदी उल्लंघनाच्या घटनांमध्ये तीन वर्षात 70 सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला. दहशतवादी हल्ल्यात 115 लोकांनी जीव गमावला. मागील काही काळात राज्यात दहशतवादी अधिकच सक्रिय झाले आहेत.

Published by: News18 Desk
First published: February 2, 2021, 8:08 PM IST

ताज्या बातम्या