त्या एका रात्रीत नेमकं काय झालं? भूमिका बदलल्याने अमित शहांचा शिवसेनेला बोचरा सवाल!

त्या एका रात्रीत नेमकं काय झालं? भूमिका बदलल्याने अमित शहांचा शिवसेनेला बोचरा सवाल!

'शिवसेनेने लोकसभेत वेगळी आणि राज्यसभेत वेगळी भूमिका घेतली. सत्तेसाठी लोक कसे रंग बदलतात हेच दिसून आलं.'

  • Share this:

नवी दिल्ली 11 डिसेंबर : लोकसभेत मंजूर झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडलं. शहांनी विधेयक मांडल्यानंतर त्यावर प्रदीर्घ चर्चा झाली. काँग्रेस, शिवसेना आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी या प्रश्नावरून मोदी सरकारवर प्रचंड हल्लाबोल केला. काँग्रेसचे गुलाम नबी आझाद, कपील सिब्बल आणि पी. चिदंबरम यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हेतूवरच शंका उपस्थित केली. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहांना तुमच्या देशभक्तीचं प्रमाणपत्र आम्हाला नको असं सांगितलं. या सगळ्या प्रश्नांना अमित शहा यांनी शेवटी सडेतोड उत्तर दिलं. या बिलावरून काँग्रेस आणि काही पक्ष संभ्रम निर्माण करून मुस्लिमांच्या मनात भीती निर्माण केली जात असल्याचा पलटवार त्यांनी काँग्रेसवर केला. तर एका रात्रीत भूमिका का बदलली असा सवाल करत त्यांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचाही प्रयत्न केला.

आप जिस स्कूल में पढ़ते हो हम उस स्कूल के हेडमास्टर है, राऊतांनी शहांना सुनावलं

अमित शहा म्हणाले, देशाचं विभाजनच धर्माच्या आधारे करण्यात आलं होतं. त्यावेळी काँग्रेसने त्या विभाजनाला का मान्यता दिली असा सवाल त्यांनी काँग्रेसला केला. इतर देशातून जे मुस्लिम नागरीक आले त्यांना अर्ज करण्याची मुभा असून ते अर्ज करू शकतात. हे विधेयक आणि देशातले मुस्लिम यांचा काहीही संबंध नाही केवळ संभ्रम निर्माण केला जात आहे असंही त्यांनी सांगितलं.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाही त्यांनी चांगलाच टोला हाणला. ते म्हणाले, सत्तेसाठी लोक कसे रंग बदलतात हे दिसून आलंय. लोकसभेत शिवसेनेनं विधेयकाला पाठिंबा दिला. मात्र एका रात्रीत त्यांनी आपली भूमिका बदलली. एका रात्रीत असं काय झालं की त्यांनी आपली भूमिका बदलली याचं उत्तर शिवसेनेने द्यावं असं ते म्हणाले. विधेयकाला विरोध करणाऱ्यांना आम्ही देशद्रोही असं कधीही म्हटलं नाही असंही त्यांनी संजय राऊत यांना सांगितलं. प्रत्येक वेळी पाकिस्तान आणि काँग्रेसच्या नेत्यांची भाषा एकच असते असा आरोप केला. त्यावर काही काळ गदारोळही झाला.

भारताचा उपग्रह ठेवणार पाकिस्तानवर लक्ष, RISAT-2BR1ची झेप

संजय राऊत काय म्हणाले?

संजय राऊत म्हणाले, या विधेयकाला काही लोक विरोध करताहेत तर काहींनी त्याचं समर्थन केलंय. विरोध करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. त्याचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. मात्र त्या प्रत्येकाला देशद्रोही म्हणणं योग्य नाही. तुमच्या प्रमाण पत्राची आम्हाला गरज नाही. हिंदुत्वाबद्दलची आमची भूमिका ही जाहीर आहे. ती आजही कायम आहे आणि उद्याही कायम राहील. आम्हाला शिकविण्याची गरज नाही. ही पाकिस्तानची संसद नाही.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2019 07:27 PM IST

ताज्या बातम्या