गृहमंत्री अमित शहांचा कामाचा धडाका, हे 10 अतिरेकी निशाण्यावर

गृहमंत्री अमित शहांचा कामाचा धडाका, हे 10 अतिरेकी निशाण्यावर

गृहमंत्री अमित शहा यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच जम्मू काश्मीरच्या टॉप 10 दहशतवाद्यांची यादी तयार करण्यात आली आहे. हे अतिरेकी गृहमंत्रालयाच्या निशाण्यावर असणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 जून : गृहमंत्री अमित शहा यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच जम्मू काश्मीरच्या टॉप 10 दहशतवाद्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत हिज्बुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या रियाज नायकू, लष्कर ए तोयबा चा जिल्हा कमांडर वसिम अहम्मद उर्फ ओसामा आणि हिज्बुलचा दहशतवादी अशरफ मौलवी यांची नावं आहेत.

सुरक्षा यंत्रणांशी सखोल चर्चा करून या दहशतवाद्यांची यादी तयार करण्यात आली आहे. काश्मीरमधल्या वेगवेगळ्या भागात दहशतवादी कारवाया पसरवण्यामध्ये या दहशतवाद्यांचा हात आहे.

हिज्बुल मुजाहिद्दीनचा बारामुल्ला जिल्ह्याचा कमांडर मेहराजुद्दीन आणि डॉक्टर सैफुल्लाह हेही गृहमंत्रालयाच्या निशाण्यावर आहेत.

102 अतिरेक्यांचा खात्मा

काश्मीरमध्ये सुमारे 286 दहशतवाद्यांच्या कारवाया सुरू आहेत. यापैकी 102 अतिरेक्यांचा सुरक्षा दलांनी खात्मा केला आहे.

ज्या पुलवामामध्ये सीआरपीएफ च्या जवानांवर हल्ला झाला त्या पुलवामामध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर अरशल उल हक यांचंही नाव या दहशतवाद्यांच्या यादीत आहे.

भाजपच्या अध्यक्षदाची जबाबदारी समर्थपणे निभावल्यानंतर अमित शहा यांनी पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्रिपदाची धुरा हाती घेतली आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेसोबतच काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी मोहीम आणखी तीव्र करण्याचं आव्हान या सरकारसमोर आहे.

झाकीर मुसा ठार

मोदी सरकार आल्या आल्याच झाकीर मुसा या हिज्बुल मुजाहिद्दीनच्या अतिरेक्याला ठार करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं होतं. बुऱ्हाण वणी मारला गेल्यानंतर झाकीर मुसा याची हिज्बुल मुजाहिद्दीनच्या काश्मीर विभागाचा म्होरक्या म्हणून नेमणूक झाली होती.

लष्कर गेले काही दिवस झाकीर मुसाच्या मागावर होतं. त्याला शोधण्यासाठी लष्कराने एक मोठी मोहीम राबवली होती. याच मोहिमेमध्ये अल कायदाचे तीन अतिरेकीही मारले गेले.

================================================================================

VIDEO: नागपुरात उष्माघाताने 4 जणांचा मृत्यू, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

First published: June 4, 2019, 4:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading