अमित शहांनी प्रकृतीबाबतच्या ‘त्या’ बातम्यांवर केला मोठा खुलासा

अमित शहांनी प्रकृतीबाबतच्या ‘त्या’ बातम्यांवर केला मोठा खुलासा

'अनेकांनी अफवा पसरविल्या,खोटी माहिती तयार केली. तर काहींनी चक्क मृत्यूसाठी प्रार्थनाही केली.'

  • Share this:

दिल्ली 09 मे: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर येत असलेल्या अफवांवर आज खुलासा केलाय. काही लोकांनी माझ्या प्रकृतीबाबत अफवा पसरवल्या, तर काहींनी मृत्यूसाठीही प्रार्थना केली. मी त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र पक्ष कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन खुलासा करत आहे. मी अगदी ठणठणीत आहे आणि कोरोनाविरुद्धच्या लढाईत अहोरात्र काम करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

एक निवेदन प्रसिद्ध करून त्यांनी हा खुलासा केलाय. ते म्हणाले, अनेकांनी अफवा पसरविल्या,खोटी माहिती तयार केली. तर काहींनी चक्क मृत्यूसाठी प्रार्थनाही केली. मात्र कोरोनाविरुद्धच्या लढाईत दिवस रात्र व्यस्त असल्याने मी त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र कार्यकर्ते आणि शुभचिंतकांनीही त्याबाबत चिंता व्यक्त केल्याने मी त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही त्यामुळे हा खुलासा करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हिंदू मान्यतेनुसार मृत्यूची अशा तऱ्हेची माहिती पसरली तर दीर्घ आयुष्य मिळतं अशी मान्यता आहे. मी ठणठणीत आहे. कुठलाही आजार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ज्यांनी या अफवा पसरविल्या त्यांच्या विषयी माझ्या मनात कुठलाही व्देष किंवा आकस नाही. त्यांनाही धन्यवाद असंही शेवटी त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

अमित शहांचं ट्वीट रिट्वीट करत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांनी दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तर केंद्रीय मंत्री जितेंद्र प्रसाद यांनीही अमित शहांना शुभेच्छा देत तुमचं मार्गदर्शन यापुढेही मिळत राहिलं असं म्हटलं आहे.

First published: May 9, 2020, 4:59 PM IST
Tags:

ताज्या बातम्या