तडाखेबंद भाषणात अमित शहांनी सुप्रिया सुळेंचं 9 वेळा घेतलं नाव, हे आहे कारण

तडाखेबंद भाषणात अमित शहांनी सुप्रिया सुळेंचं 9 वेळा घेतलं नाव, हे आहे कारण

आम्ही चर्चातरी कुणाशी करायची. जे पाकिस्तानच्या तालावर नाचतात त्यांच्याशी आम्ही चर्चा कशी करणार?

  • Share this:

नवी दिल्ली 6 ऑगस्ट : कलम 370 वर लोकसभेत आज वादळी चर्चा झाली. बहुमतामुळे हे विधेयक मंजूर व्हायला काहीही अडचण आली नाही. राज्यसभेत सोमवारीच हे विधेयक मंजूर झालं होतं. आज झालेल्या चर्चेत विविध पक्षांच्या खासदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्ला चढवला. एवढा मोठा निर्णय घेताना तो योग्य पद्धतीने घेतला गेला नाही. खोऱ्यातल्या लोकांशी, नेत्यांशी चर्चा करायला पाहिजे होती असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं होतं. त्याचबरोबर अनेक मुद्यांवर त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले.

काश्मीरच्या सुंदर खोऱ्यात घर घ्यायचंय? एका प्लॉटची ही आहे किंमत

सर्वात शेवटी केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी तडाखेबंद भाषण करत सर्व खासदारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांना उत्तरं दिलीत. या उत्तराच्या भाषणात त्यांनी खासदार सुप्रीया सुळे यांचा 9 वेळा उल्लेख केला. ते म्हणाले, आम्ही कुणाशी चर्चा केली नाही असा आक्षेप सुप्रिया ताईंनी घेतलाय. मात्र आम्ही चर्चातरी कुणाशी करायची. जे पाकिस्तानच्या तालावर नाचतात त्यांच्याशी आम्ही चर्चा कशी करणार?

काँग्रेसच्या या नेत्याने दिला धक्का, काश्मीरबदद्लच्या निर्णयाला पाठिंबा

गेली 70 वर्ष आम्ही चर्चाच करत आहोत. तीन-चार पीढ्या झाल्या नुसती चर्चा सुरू आहे. कधीतरी मार्ग बदलला पाहिजे. आम्ही आज तो प्रयत्न केला. 70 वर्षात 40 हजारांपेक्षा जास्त लोक मारले गेले. किती दिवस त्याच त्याच मार्गाने जात राहायचं. सर्वांनीच या नव्या प्रयोगाला साथ दिली पाहिजे असं आवाहनही त्यांनी केली.

पाकव्याप्त काश्मीरला भारतात सामील व्हायचंय

जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवल्यानंतर आता पाकव्याप्त काश्मीरमधूनही भारतात सामील होण्याची मागणी होतेय. PoKतल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अशी मागणी केलीय. भारताच्या संविधानावर आम्हाला पूर्ण विश्वास असल्याचं गिलगिट-बाल्टिस्तान (Gilgit-Baltistan)च्या लोकांनी म्हटलं आहे.

इस्लामाबादमध्ये संजय राऊत यांची पोस्टर्स, पाकिस्तानमध्ये हडकंप

पाकव्याप्त नागरिकांच्या या मागणीमुळे इम्रान खान सरकारला घरचा अहेर मिळाला आहे. काश्मीरमधल्या या भागावर पाकिस्तानने अनधिकृत ताबा मिळविल्याचा भारताचा दावा असून हा भाग भारतात सामील झाल्याशीवाय काश्मीरचा प्रश्न मिटणार नाही अशी भारताची भूमिका आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 6, 2019 09:31 PM IST

ताज्या बातम्या