आश्चर्य...अमित शहांच्या या प्रस्तावाला ममता बॅनर्जींचा पाठिंबा

आश्चर्य...अमित शहांच्या या प्रस्तावाला ममता बॅनर्जींचा पाठिंबा

भाजपला जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणुका नको आहेत त्यामुळेच त्यांनी हे विधेयक मांडल्याचा आरोप काँग्रेसने केलाय.

  • Share this:

नवी दिल्ली 1 जुलै : भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात सध्या रोजदार राजकीय संघर्ष सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा हे ममता बॅनर्जींचं टार्गेट आहेत. केंद्राच्या प्रत्येक गोष्टीत ममतांची आडकाठी असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या बैठकांनाही त्या उपस्थित राहत नाहीत. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडलेल्या एका विधेयकाला तृणमूलने पाठिंबा दिला. जम्मू आणि काश्मीरमधली राष्ट्रपती राजवटीची मुदत वाढविण्याचं विधेयक शहा यांनी मांडलं होतं त्याला तृणमुलने पाठिंबा दिलाय. काँग्रेसने मात्र या विधेयकाला विरोध केलाय.

भाजपला जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणुका नको आहेत त्यामुळेच त्यांनी हे विधेयक मांडल्याचा आरोप काँग्रेसने केलाय. तर आम्हाला राजकारण करायचं नाहीये, तिथली परिस्थिती सुरळीत झाली की निवडणूक आयोग निवडणुका जाहीर करेल असं स्पष्टीकरण अमित शहा यांनी दिलं होतं. निवडणुका या सरकार नाही तर आयोग जाहीर करतं. काँग्रेसला आत्तापर्यंत आयोगाच्या कामात हस्तक्षेप करण्याची सवय होती ती आम्हाला नाही असंही ते म्हणाले.

'अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदीयांनी केला 1108 कोटींचा घोटाळा'

अमित शहांची नेहरुंवर टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरप्रश्नी संसदेत निवेदन दिलं. दिवंगत पंतप्रधान पंडित जहवारलाल नेहरू यांनीच काश्मीर प्रश्न निर्माण केला, त्यावेळी त्यांनी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनाही विश्वासात घेतलं नाही, अशी जोरदार टीका अमित शहा यांनी केली. 28 जूनला लोकसभेत बोलताना त्यांनी ही टीका केली.

काँग्रेसने काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा दिला. त्यामुळे काँग्रेसचं युनिट तिथे कधी उभंच राहिलं नाही. काश्मीरची सूत्रं म्हणूनच शेख अब्दुल्लांच्या हातात गेली आणि त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला, असंही अमित शहा म्हणाले.

आमच्या सरकारने सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइक केला पण यामध्ये एकाही काश्मिरी नागरिकाचा बळी गेलेला नाही, असं त्यांनी सांगितलं.

आमच्या आदेशाचे पालन का नाही केलं; SCनं ममता बॅनर्जीला फटकारलं!

काश्मीर दौरा

गृहमंत्री अमित शहा यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच दोन दिवसांचा काश्मीर दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी तिथला सुरक्षा आढावा घेतला. 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या सुरक्षाव्यवस्थेबद्दलही त्यांनी जाणून घेतलं.

काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढतालढता शहीद झालेले पोलीस अधिकारी अर्शद खान यांच्या कुटुंबीयांचीही अमित शहा यांनी भेट घेतली. सीमेवरच्या हिंसाचारात ज्यांचा बळी गेला आहे त्यांच्या कुटुंबीयांसाठीच्या नुकसान भरपाईत वाढ करण्यात आली आहे, असंही अमित शहा यांनी संसदेत सांगितलं.

काश्मीरमध्ये विद्युत प्रकल्प उभे करण्यासाठी सरकारने निधी दिला आहे. त्यासोबतच आयआयटी, आयआयएमची उभारणी, पायाभूत संरचना यावर आमचा भर आहे, असं ते म्हणाले.

First published: July 1, 2019, 6:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading