Home /News /national /

गृहमंत्री अमित शहा यांना AIIMSमधून डिस्चार्ज, पुन्हा कामकाजाला केली सुरूवात

गृहमंत्री अमित शहा यांना AIIMSमधून डिस्चार्ज, पुन्हा कामकाजाला केली सुरूवात

डिस्चार्ज मिळाल्यानंतर शहा यांनी पुन्हा कामकाजाला सुरूवात केली आहे.

    नवी दिल्ली 17 सप्टेंबर: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांना गुरूवारी दिल्लीतल्या एम्स All India Institute Of Medical Scienceमधून डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुक्त झाल्यानंतरच्या उपचारांसाठी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वास घ्यायला थोडा त्रास जात होता त्यामुळे शनिवारी रात्री पुन्हा एकदा एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. डिस्चार्ज मिळाल्यानंतर शहा यांनी पुन्हा कामकाजाला सुरूवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी त्यांच्या मतदार संघातल्या विविध विकास कामांचं व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे उद्घाटन केलं. 30 ऑगस्टला अमित शहा यांची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली होती. मात्र नंतर त्यांना काही दिवसांनी अस्वस्थ वाटत होतं. त्यामुळे त्यांना AIIMSमध्ये दाखल करण्यात आलं होतं. शऩिवारी त्यांना पुन्हा एकदा श्वास घ्यायला त्रास वाटत असल्याने AIIMSमध्ये दाखल करण्यात आलं होतं. शहा यांना कोरोनामुक्ती नंतरच्या उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये येण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये आल्याचं AIIMSने म्हटलं होतं. शहा यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. नंतर त्यांना 14 ऑगस्टला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर त्यांना 18 ऑगस्टला त्यांना थकवा जाणवत होता. त्यानंतर त्यांना 18 ऑगस्टला पुन्हा भरती करण्यात आलं होतं. नंतर 30 ऑगस्टला त्यांना डिस्चार्ज मिळाला होता.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Amit Shah, Coronavirus

    पुढील बातम्या