Home /News /national /

VIDEO : गुजरात दंगलीबाबत 20 वर्षांनी सोडलं अमित शहांनी मौन, सर्व आरोपांना दिलं उत्तर

VIDEO : गुजरात दंगलीबाबत 20 वर्षांनी सोडलं अमित शहांनी मौन, सर्व आरोपांना दिलं उत्तर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या दंगलीबाबत (Gujrat Riots 2022) तब्बल 20 वर्षांनी मौन सोडलं आहे.

    मुंबई, 25 जून :  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या दंगलीबाबत (Gujrat Riots 2022) तब्बल 20 वर्षांनी मौन सोडलं आहे. गुजरातमध्ये 20 वर्षांपूर्वी झालेल्या या दंगलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 64 जणांना क्लीनचीट देणाऱ्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी ही याचिकी फेटाळली. त्यानंतर ANI ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये अमित शहा यांनी दंगलीबाबतच्या सर्व आरोपांना उत्तर दिले. काय म्हणाले अमित शहा? गुजरात दंगलीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narenra Modi) आणि भाजपा सरकारवर राजकीय हेतूंनी आरोप करण्यात आले होते, असा दावा शहा यांनी केला. पंतप्रधान मोदींनी  शिव शंकराप्रमाणे हे सर्व विष प्राशन केले. ते 19 वर्ष हे सर्व सहन करत होते, असं शहा यांनी सांगितलं. ग्रोधामधील रेल्वे जाळल्यानंतर झालेल्या दंगली या पूर्वनियोजित नव्हत्या तर स्वप्रेरित होत्या असा दावाही शहा यांनी केला. राहुल गांधींना टोला 'मी नरेंद्र मोदी यांची सर्व वेदना जवळून पाहिली आहे. दृढ इच्छाशक्ती असलेला व्यक्तीच हे सर्व सहन करू शकतो. हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ट होते, त्यामुळे या विषयावर काहीही न बोलण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. मोदींनी एसआयटीसमोर चौकशीसाठी जाताना कोणतीही नाटकं केली नाहीत. मला पाठिंबा देण्यासाठी या असं आवाहन केलं नाही. आमदार आणि खासदारांना बोलवलं नाही,' असं सांगत अमित शहा यांनी यावेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नाव न घेता टोला लगावला. गुजरात दंगल प्रकरण : पंतप्रधानांना मोठा दिलासा; मोदींविरोधातील ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली त्रिकुटाचा भाजपाविरोधात प्रचार 'भाजपचे राजकीय विरोधक, राजकीय विचारांनी प्रेरित पत्रकार आणि काही स्वयंसेवी संस्थांच्या त्रिकुटानं एकत्र येत सर्व आरोपांचा प्रचार केला. त्यांना भक्कम इकोसिस्टमची साथ होती. त्यामुळे प्रत्येकाला खोटं हे खरं वाटत होतं, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात तिस्ता सेटलवाड यांचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यांचीही एक एनजीओ होती. त्या एनजीओनं सर्व पोलीस स्टेशनमध्ये भाजपाशी संबंधित कार्यकर्त्यांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. या सर्व तक्रारी खऱ्या मानाव्या असा मीडियावरही दबाब होता, असा आरोप शहा यांनी या मुलाखतीमध्ये केला आहे.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Amit Shah, Gujarat, Narendra modi

    पुढील बातम्या