अमित शहांनी केली मोठी घोषणा; संपूर्ण देशात NRC लागू करणार

अमित शहांनी केली मोठी घोषणा; संपूर्ण देशात NRC लागू करणार

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तिसऱ्याच दिवशी गृहमंत्री अमित शाहा यांनी मोठी घोषणा केली. संपूर्ण देशभर राष्ट्री नागरिक नोंदणी उपक्रम (NRC) राबवणार असल्याचं त्यांनी राज्यसभेत सांगितलं. शिवाय Citizenship Amendment Bill बद्दलसुद्धा मोठी घोषणा करण्यात आली.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तिसऱ्याच दिवशी गृहमंत्री अमित शाहा यांनी मोठी घोषणा केली. संपूर्ण देशभर राष्ट्री नागरिक नोंदणी उपक्रम (NRC)राबवणार असल्याचं त्यांनी राज्यसभेत सांगितलं. NRC ची प्रक्रिया कुठल्याही धर्माच्या आधारावर केली जाणार नाही. धार्मिक, वांशिक भेदाभेद यामध्ये नसतील, असंही अमित शहा यांनी स्पष्ट केलं.

NRC वर राज्यसभेत चर्चा सुरू असताना अमित शहा यांनी ही घोषणा केली. "धर्माधारित नागरिक नोंदणी करणं या NRC मध्ये अपेक्षित नाही. ज्या वेळी देशभर NRC करण्यात येईल, त्या वेळी पुन्हा एकदा आसाममध्येही ही प्रक्रिया होईल. कुठल्याही धर्माच्या नागरिकांना NRC पासून धोका नाही. त्यामुळे त्यांनी या प्रक्रियेला घाबरून जाऊ नये. सर्व समूहांना NRC अंतर्गत सामावून घेण्याची व्यवस्था आहे," अशी माहिती अमित शहांनी राज्यसभेला दिली.

अमित शहा असंही म्हणाले की, "देशात आश्रयाला आलेले निर्वासित कुठल्याही धर्माचे असले तरी त्यांना आश्रय द्यावा, असं सरकारचं मत आहे."

वाचा - नाशिकमध्ये नवं समीकरण... भाजपसोबत पुन्हा एक ठाकरे?

Citizenship Amendment Bill पुन्हा एकदा नव्याने संसदेत मांडलं जाईल. याचा NRC शी संबंध नसेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आसाममध्ये काय झालं?

आसाममध्ये सर्वप्रथम NRC ची प्रक्रिया करण्यात आली. इथल्या NRC ची पहिली यादी 31 ऑगस्टला जारी करण्यात आली.

वाचा - 'आमदारांनो! आधार कार्ड घेऊन या, लवकरच होणार शपथविधी'

या यादीत 19 लाखांहून अधिक जणांची नावं नव्हती. 3 कोटी 30 लाख 27 हजार 661 लोकांनी NRC साठी नोंदणी केली होती. त्यापैकी 19,06,657 लोकांना या यादीत स्थान देण्यात आलं नाही.  बाकीचे भारतीय नागरिक असल्याचं सिद्ध झालं. या यादीतून एवढ्या मोठ्या संख्येने विशिष्ट धर्माचे लोक वगळण्याचा आरोप करण्यात आला आणि त्यावरूनच गदारोळ सुरू आहे.

------------------------------------

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, मोदी आणि पवारांच्या भेटीत काय घडलं? पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2019 03:02 PM IST

ताज्या बातम्या