मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची प्रकृती बिघडली, रात्री उशिरा AIIMS मध्ये दाखल

मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची प्रकृती बिघडली, रात्री उशिरा AIIMS मध्ये दाखल

ऑगस्ट महिन्यात अमित शाह यांना कोरोनाचे लक्षण दिसू लागल्यानं त्यांनी चाचणी केली आणि पॉझिटिव्ह आली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 सप्टेंबर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केल्यानंतर शनिवारी रात्री अचानक पुन्हा त्यांची प्रकृती खालवली. रात्री 11 वाजता त्यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. गेल्या काही दिवसांपूर्वीच अमित शाहांना कोरोनाची (corona virus) लागण झाली मात्र उपचारानंतर कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता मात्र शनिवारी पुन्हा एकदा प्रकृती बिघडल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अमित शाह यांना शनिवारी रात्री उशिरा श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यामुळे तातडीनं त्यांना एम्समध्ये भर्ती करण्यात आलं. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनावर (corona news) यशस्वीपणे मात करून अमित शाह पुन्हा घरी परतल्यानंतर त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला.

हे वाचा-WHO म्हणतं, कोरोना विरुद्ध कसं लढावं हे जगाने पाकिस्तानकडून शिकावं!

ऑगस्ट महिन्यात अमित शाह यांना कोरोनाचे लक्षण दिसू लागल्यानं त्यांनी चाचणी केली आणि पॉझिटिव्ह आली होती. त्यांनी या संदर्भात स्वत: ट्वीट करून माहिती दिली होती. त्यानंतर 14 ऑगस्टला त्यांनी कोरोनावर मात केल्यानं त्यांची चाचणी निगेटिव्ह आली. तेव्हा रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळाली आणि शाह होम क्वारंटाइन होते. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी शाह यांना श्वसनाचा त्रास आणि ताप येऊ लागला होता.

हे वाचा-ग्रामीण भागात पसरतोय कोरोना! Sero सर्व्हेचा दुसरा टप्पा असू शकतो आणखी भीषण

डॉक्टरांनी उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल केलं. 12 दिवसांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. शनिवारी रात्री उशिरा पुन्हा श्वसनाचा त्रास होत असल्यानं अमित शाह यांना एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांची टीम सध्या त्यांच्यावर उपचार करत असल्याची माहिती मिळाली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 13, 2020, 7:15 AM IST

ताज्या बातम्या