Home /News /national /

कोरोनाच्या महासंकटात अभिनेत्रीनं दिला मदतीचा हात, भुकेलेल्या मुलांसाठी 7.50 कोटींची मदत

कोरोनाच्या महासंकटात अभिनेत्रीनं दिला मदतीचा हात, भुकेलेल्या मुलांसाठी 7.50 कोटींची मदत

अँजेलिनाने एका स्वयंसेवी संस्थेला मदत दिली आहे. अमेरिकेत लोकांची भूक भागवण्यासाठी त्यांना अन्न पुरवठा करण्याचं काम एक संस्था करते

    मुंबई, 28 मार्च : जगभर कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. आतापर्यंत यामुळे जगात 20 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू इटलीत झाले आहेत. अनेक देशांमध्ये जनजीवन ठप्प झाले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी काही देशांनी लॉकडाउन केलं आहे. दरम्यान, कोरोनामुळे सर्वत्र बंदची परिस्थिती असल्यानं अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा लोकांसाठी जगभरातून मदतीचा हात पुढे केला जात आहे. आता हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीने एक मिलियन अमेरिकन डॉलर्सची मदत दिली आहे. अँजेलिनाने एका स्वयंसेवी संस्थेला मदत दिली आहे. अमेरिकेत लोकांची भूक भागवण्यासाठी त्यांना अन्न पुरवठा करण्याचं काम एक संस्था करते. त्या संस्थेला अँजेलिनाने एक मिलियन डॉलर म्हणजेज भारतीय चलनानुसार जवळपास सात कोटी 50 लाख रुपये दान केले आहेत. अमेरिकेतही लॉकडाउन करण्यात आलं असून तिथल्या नागरिकांना अन्न पुरवताना नो किड हंग्री संस्थेवर आर्थिक ताण येत होता. त्यांचे हे अन्नदानाचे काम सुरु रहावे यासाठी अँजेलिनाने पुढाकार घेतला. हे वाचा-हनीमूनसाठी गेले आणि पैसे संपले; मुंबई, पुण्यासह 27 नवविवाहीत जोडपी परदेशात अडकली कोरोनामुळे अनेक ठिकाणी मदतीची गरज आहे. अशा गरजूंना जगभरातून मदत केली जात आहे. उद्योगपती, खेळाडू, कलाकार मंडळी मदत करत आहे. रोनाल्डो, फेडरर, मेस्सी यांनीही कोरोनाग्रस्तांसाठी आर्थिक मदत केली आहे. याशिवाय भारतीय खेळाडूंनीसुद्धा आर्थिक मदत केली आहे. अँजेलिना जोलिशिवाय हॉलिवूडमध्ये लेडी गागा, शॉन मेंडिस, जेम्स होप्स यांनीही मदत केली आहे. कोरोना रोखायचा असेल तर सुरक्षित रहा असं आवाहन करत अनेक दिग्गज मंडळींनी आर्थिक तसेच अत्यावश्यक साहित्याचा पुरवठा केला जात आहे. हे वाचा-आडमार्गाने निघाले गावाला, वाटेतच घडला अपघात; दोघांचा जीव धोक्यात!
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms

    पुढील बातम्या