• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • देशभरात होळीचा उत्साह; पर्यावरणपुरक होळीचं आवाहन

देशभरात होळीचा उत्साह; पर्यावरणपुरक होळीचं आवाहन

आज वृंदावन मथुरेच्या मंदिरातमध्ये होळीनिमित्त प्रचंड गर्दी होते. नैसर्गिक रंगांनी होळी खेळण्य़ाचं आवाहन केलं जातं आहे. तसंच फुगे अंडे या गोष्टींच्या साहाय्यानेही होळी खेळू नये असं आवाहन होतं आहे.

  • Share this:
02 मार्च:  आज धुलीवंदन!  त्यामुळे सगळीकडे आनंदाचा माहोल आहे. सगळीकडे रंग पिचकाऱ्यांना होळी खेळण्यास सुरूवात होतो आहे. आज  सलगच्या सुट्ट्यांमुळे अनेकांनी बाहेर प्लॅन केले  आहेत. आज वृंदावन मथुरेच्या मंदिरातमध्ये होळीनिमित्त प्रचंड गर्दी होते. नैसर्गिक  रंगांनी होळी खेळण्य़ाचं आवाहन केलं जातं आहे. तसंच फुगे  अंडे या गोष्टींच्या साहाय्यानेही होळी खेळू नये असं आवाहन होतं आहे. मुंबईसह राज्यभरात होळीचा सण साजरा करण्यात येतोय. कोकणातील पारंपरिक शिमगोत्सव जोमात साजरा होतोय. घरोघरी पुरणाची पोळी बनवण्यासाठी महिला वर्गांमध्ये लगबग सुरु आहे. तर धुळवड- रंगपंचमीसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. बच्चे कंपनीसोबत मोठे लोकंही पिचकारी आणि रंग विकत घेण्यासाठी बाजारात गर्दी करत आहेत.  देशभरातही होळीचा उत्साह दिसून येतोय. आज  जर घरा बाहेर पडणार असाल तर थोडा ट्रॅफीकचा अंदाज घेउनच बाहेर पडा.सलगच्या सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या असून वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न तिथं सुरू आहे.
First published: