• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • वाराणसीत रंगली स्मशानातली होळी!

वाराणसीत रंगली स्मशानातली होळी!

यावर्षी 27 फेब्रुवारीला राखेची होळी खेळली गेली. या जल्लोषात साधू, परदेशी पर्यटकांनी भाग घेतलाय.

  • Share this:
28 फेब्रुवारी : होळी जवळ आली. देशभर होळी आणि धूळवडीची धूम जोरात असते. बरसानामध्ये लठ्ठमार होळी तर वाराणसीत राखेची होळी खेळली जाते. यावर्षी 27 फेब्रुवारीला राखेची होळी खेळली गेली. या जल्लोषात साधू, परदेशी पर्यटकांनी भाग घेतलाय. शंकर महादेव होळी खेळायला काशीत आले होते, अशी आख्यायिका आहे. तिथे स्मशानात जाऊन होळी खेळायची परंपरा आहे. ती आजही आहे. त्याप्रमाणे मंगळवारी शिवभक्त आणि साधूंनी शिवाचा अंश समजल्या जाणाऱ्या बाबा मसाननाथची पूजा केली गेली. त्यांना भांग, गांजेचा नैवेद्य दाखवला. यावेळी स्मशानात 51 वाद्यांच्या आवाजात स्मशानातली राख एकमेकांना लावून होळी खेळली गेली. महास्मशान आणि गंगा किनारी हर हर महादेवचा आवाज गुंजला. या जल्लोषात सगळेच रंगून गेले.
First published: