Elec-widget

जवानाच्या चुकीमुळं भारताच्या माजी कर्णधाराला लागली होती गोळी, आता भाजपनं दिले मंत्रीपद

जवानाच्या चुकीमुळं भारताच्या माजी कर्णधाराला लागली होती गोळी, आता भाजपनं दिले मंत्रीपद

भारताच्या माजी कर्णधाराला भाजपनं दिलं राज्यमंत्रीपद.

  • Share this:

हरियाणा, 14 नोव्हेंबर : हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि जननायक जनता पार्टी (जेजेपी) यांच्या वतीनं मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला. यात 10 मंत्र्यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यात भारताच्या माजी कर्णधाराचाही समावेश आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाच दिग्गज खेळाडू मरता मरता वाचला होता.

भाजपच्या वतीनं विधानसभा निवडणूक लढवलेला हॉकी स्टार संदीप सिंगला राज्यमंत्रीपद देण्याच आले आहे. आज संदीपनं 10 मंत्र्यांसोबत शपथ घेतली. संदीप भारतीय हॉकी संघाचा कर्णधार राहिला आहे. दरम्यान कर्णधार असतानाच एकदा जवानाच्या हातून चुकून गोळी सुटली आणि संदीपच्या पायाला लागली. या अपघातामुळं संदीप व्हिल चेअरवर होता, त्याला हॉकीही सोडावे लागले. संदीपच्या या कहानीवर सुरमा नावाचा एक चित्रपटही प्रदर्शित झाला होता.

वाचा-SPECIAL REPORT : पिकविमा कंपन्यांचं धक्कादायक वास्तव, बीडचे 1 लाख शेतकरी वंचित!

वाचा-चांद्रयान मोहिमेबद्दल मोठी बातमी, पाहा हा VIDEO

संदीपच्या पायाला गोळी लागल्यानंतर 3 वर्षांसाठी तो पॅरालाईज झाला होता. त्यानंतर 2008मध्ये पुन्हा त्यानं हॉकीमध्ये पुनरागमन केले. संदीपचा जन्म 27 फेब्रुवारी रोजी हरियाणातील कुरुक्षेत्र येथे झाला. संदीपनं 2004मध्ये भारतीय संघाकडून हॉकीमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तो आपल्या शानदार खेळीमुळं चर्चेत आला होता. आजही त्याची ओळख पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्ट म्हणून आहे.

वाचा-सोन्याच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या 24 कॅरेटचे आजचे भाव

जवानाच्या एका चुकीमुळे लागली होती गोळी

जर्मनीमध्ये होणाऱ्या हॉकी वर्ल्ड कपमध्ये भारताकडून खेळण्याचे स्वप्न पाहणाऱ्या संदीपसोबत एक धक्कादायक प्रकार घडला. आपल्या संघातील खेळाडूंसोबत शताब्दी एक्सप्रेसनं दिल्लीला जात असताना एका जवानाच्या बंदुकीतून गोळी झाडली गेली. जी संदीपच्या पायाला लागली. त्यानंतर तब्बल तीन वर्ष संदीप पॅरालाईज होता. त्यानंतर पुन्हा संदीप भारतीय संघाकडून खेळेल असे कोणालाच वाटले नव्हते. मात्र 2 वर्ष व्हिल चेअरवर असलेल्या या खेळाडूनं मैदानावर दणक्यात एण्ट्री केली. 2009मध्ये सुल्तान अजलान कपमध्ये त्यानं पुनरागमन केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2019 06:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...