भोपाळ 06 फेब्रुवारी : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी 8 फेब्रुवारीला मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांची जाहीर सभाही भोपाळमध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर भोपाळ आणि अनेक शहरांमध्ये काँग्रेसने पोस्टर्स लावून राहुल गांधींच्या स्वागताची तयारी केलीय. आत्तापर्यंत काँग्रेस राम मंदिरावर कधीच उघडपणे बोलत नव्हती मात्र या पोस्टरवर राहुल गांधी हेच राम मंदिर बांधतील असं लिहिलं आहे.
मध्य प्रदेशच्या निवडणुकीतही काँग्रेसने सॉफ्ट हिंदूत्वाचा आधार घेतला होता. त्यानंतरही मुख्यमंत्री कमलनाथ यांनी गायीच्या संवर्धनासाठी अनेक निर्णय जाहीर केले होते. काँग्रेसने लावलेल्या पोस्टर्सवर कमलनाथ यांना हनुमान आणि गो भक्त तर राहुल गांधी यांना राम भक्त असं विशेषण लावण्यात आलंय.
Madhya Pradesh: Hoarding seen in Bhopal ahead of Congress President Rahul Gandhi's visit to the city on February 8. The hoarding addresses CM Kamal Nath as 'Hanuman evam Gau Bhakt' and Rahul Gandhi as 'Ram bhakt'. pic.twitter.com/6TLqn5sBID
— ANI (@ANI) February 6, 2019
एवढच नाही तर राहुल गांधी सर्वसंमत्तीने अयोध्येत राम मंदिर बांधतील असंही पोस्टर्सवर लिहिलेलं आहे. त्यावरून आता राजकारण सुरू झालंय. लोकसभेच्या निवडणुका असल्यानेच काँग्रेस रामाचा आधार घेत असल्याची टीका भाजपने केली आहे.