Home /News /national /

नायकूच्या खात्म्यानंतर हिजबुलने काश्मीरमध्ये नियुक्त केला नवा कमांडर

नायकूच्या खात्म्यानंतर हिजबुलने काश्मीरमध्ये नियुक्त केला नवा कमांडर

जम्मू आणि काश्मीरमधले दहशतद्यांचे हल्ले आणि हंदवाडा एन्काउंटरमुळे पाकिस्तानला भारताच्या कारवाईची भीती वाटते आहे.

    नवी दिल्ली 11 मे: पाकिस्तान समर्थित हिजबुल मुजाहिद्दीन ने जम्मू आणि काश्मीरसाठी नवा कमांडर नियुक्त केला आहे. गाझी हैदर असं त्याचं नावं आहे. रियाज नायकू या हिजबुल कमांडरचा सुरक्षा दलाने खात्मा केला होता. त्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीवर लष्कराच्या गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख केजेएस धिल्लन यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीय. असे किती गाझी आले आणि किती गाझी गेले असं ट्वीट त्यांनी केलं आहे. हिजबुलचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन यांनी काही दिवसांपूर्वीच नायकूच्या खात्म्यानंतर शोकसभा आयोजित केली होती. सलाहुद्दीन हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्यानंतरही उजळ माथ्याने पाकिस्तानात वावरतो आहे. जम्मू आणि काश्मीरमधले दहशतद्यांचे हल्ले आणि हंदवाडा एन्काउंटरमुळे पाकिस्तानला भारताच्या कारवाईची भीती वाटते आहे. हंदवाडा एन्काउंटरमध्ये भारताचे एका कर्नलसह 4 जवान शहीद झाले होते. भारत त्याचा बदला घेऊ शकतो अशी भीती पाकिस्तानला आहे. भारताने या आधी दोन वेळा सर्जिकल स्ट्राईक केले आहेत. त्यामुळे सीमेवर लढाऊ विमानांची गस्त पाकिस्तानने सुरू केल्याची माहिती ANIने दिली आहे. रस्त्यावरच झाली प्रसूती, नंतर बाळाला घेऊन 160 किमी चालली आई, पण फुटला नाही पाझर गेल्या काही दिवसांमध्ये काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा पथकांवर हल्ले केले आहेत. त्यात हंदवाडाचा हल्ला हा सर्वात मोठा होता. त्यानंतर रियाज नायकू या हिजबुलच्या कमांडरचा सुरक्षा दलाने खात्मा केला होता. भारताचे 5 जवान शहीद झाल्याने पुन्हा सर्जिकल स्ट्राईक होऊ शकते असं पाकिस्तानच्या लष्कराला वाटतं. दुध, भाजी आणि किराना दुकानदारच 'Super-Spreaders', रुग्णसंख्या 14 हजारांवर? त्यातूनच पाकिस्तानने अत्याधुनिक F-16 आणि JF-17 ही अत्याधुनिक लढाऊ विमानं सीवेजवळ तैनात केली असून त्यांची गस्तही सुरू असल्याचं दिसून आलंय. भारतीय लष्कर आणि गुप्तचर संस्था सीमेजवळ घडणाऱ्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या