मराठी बातम्या /बातम्या /देश /

12 लाखाचं इनाम लागलेला काश्मिरी दहशतवादाचा चेहरा रियाझ नायकूला ठार करण्यासाठी असा रचना सापळा

12 लाखाचं इनाम लागलेला काश्मिरी दहशतवादाचा चेहरा रियाझ नायकूला ठार करण्यासाठी असा रचना सापळा

10 वर्षांपूर्वीच्या एका घटनेनं गणिताच्या शिक्षकाला दहशतवादी बनवलं. हा most wanted अतिरेकी सुरक्षा दलाच्या चकमकीत मारला गेला. नेमकं काय झालं रात्री याची माहिती आता समोर येत आहे.

10 वर्षांपूर्वीच्या एका घटनेनं गणिताच्या शिक्षकाला दहशतवादी बनवलं. हा most wanted अतिरेकी सुरक्षा दलाच्या चकमकीत मारला गेला. नेमकं काय झालं रात्री याची माहिती आता समोर येत आहे.

10 वर्षांपूर्वीच्या एका घटनेनं गणिताच्या शिक्षकाला दहशतवादी बनवलं. हा most wanted अतिरेकी सुरक्षा दलाच्या चकमकीत मारला गेला. नेमकं काय झालं रात्री याची माहिती आता समोर येत आहे.

  श्रीनगर, 6 मे : गेली अनेक वर्षं 'तो' काश्मीर खोरं अशांत राहावं म्हणून लोकांना भडकवण्याचं काम करत होता. सुरक्षा दलाचे जवान त्याचं लक्ष्य होतं. कुख्यात दहशतवादी आणि हिज्बुल मुजाहिदीनचा प्रमुख कमांडर रियाझ नायकू (Riyaz Naikoo) याचा सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत अखेर खात्मा झाला. तो काश्मिरी दहशतवादाचा नवा चेहरा बनू पाहात होता.  काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांना हे मोठं यश कसं मिळाली, याची माहिती आता समोर येत आहे. सुरक्षा दलाच्या या कारवाईत एकही निष्पाप नागरिक मारला गेला नाही किंवा जखमीही झाला नाही. रात्रीत सापळा रचून दहशतवाद्याला लक्ष्य केलं गेलं. रियाझ नायकू हा गेले अनेक दिवस काश्मीर खोऱ्यात दहशत पसरवत होता. त्याच्यावर 12 लाखाचं इनाम जाहीर करण्यात आलं होतं. पोलीस आणि सुरक्षा दलाला लक्ष्य करत त्याने काश्मीरमध्ये अनेक कारवाया केल्या होत्या. दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत रियाझ मारला गेला.

  संबंधित - हिज्बुलच्या कमांडर रियाझ नायकूचा खात्मा; गणिताचा शिक्षक कसा झाला क्रूरकर्मा दहशतवादी?

  2016 मध्ये बुरहान वाणीच्या अंतानंतर रियाझ नायकूचं नाव पुढे आलं होतं. तो काश्मीर खोऱ्याच्या दहशतवादाचा नवा चेहरा बनला होता. पोलिसांच्या कुटुंबीयांचं अपहरण, कुणी दहशतवादी मारला गेल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेच्या वेळी बंदुकीची सलामी देणं अशा कारवायांनी तो चर्चेत होता. काश्मीरमधल्या युवा पिढीला दहशतवादाकडे खेचून घेण्याचं काम तो करत होता. रियाझ नायकू हा कुठे लपला आहे याची माहिती  गुप्तचर संस्थांकडून सुरक्षा दलाला समजली. त्यानंतर सापळा रचण्यात आला. 5 मे रोजी संध्याकाळी उशिरा रियाझबद्दलची माहिती सुरक्षा दलांना समजली. त्यानंतर रात्रीच गुप्त कारवाईला सुरुवात झाली. रियाझ लपला होता त्या जागी पहाटे 2 च्या सुमारास जवान पोहोचले. आसपासच्या घरांमधल्या नागरिकांना सूचना देत त्यांना तिथून हटवण्यात आलं. सकाळी साडेनऊ वाजता दहशतवाद्यांशी पहिल्यांदा संपर्क केला गेला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार चकमक झाली. सुमारे 4 तास ही धुवांधार चकमक सुरू होती. अखेर दुपारी 1 च्या सुमारास सुरक्षा दलांनी रियाझला अलगद टिपलं. त्याच्याबरोबर असलेला आणखी एक दहशतवादी या चकमकीत मारला गेला. वाचा ...आणि कोरोना योद्धा गहिवरला, रस्त्यावरच केक कापून साजरा केला वाढदिवस रियाझ लपला होता त्या जागेवरून सुरक्षा दलांनी दोन एके 47 रायफली आणि बराच दारुगोळा जप्त केला आहे. या दोघांच्या मृतदेहांची ओळख पटवण्यात पुढचा वेळ गेला. रियाझच्या अंगावर असलेल्या खुणांवरून त्याची ओळख पक्की केली गेली. रियाझ नायकू हा 2010 पूर्वी गणिताचा शिक्षक म्हणून काम करत असे. मूलतत्त्ववादी चळवळीकडे तो ओढला गेला. काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्यासाठी हिज्बुल मुजाहिदीनने रियाझला हालाशी धरलं आणि तो या संघटनेत मोठा होत गेला. मुलांना गणित शिकवणारा एक शिक्षक हातात शस्त्रास्त्र घेऊन सुरक्षा दलांना लक्ष्य करू लागला. 10 वर्षांपूर्वी असं काय झालं? 2010 मध्ये काश्मीरमध्ये काही युवकांनी निदर्शनं केली. तिथे गर्दी पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराचा वापर केला. त्या अश्रुधुराची नळकांड्यापैकी एक लागल्याने अहमद मट्टो नावाचा 17 वर्षांचा तरुण मरण पावला. त्यानंतर काश्मीर खोऱ्यात हिंसाचार भडकला. अनेक तरुण आंदोलनात उतरले. त्यात एक रियाझ नायकू होता. पोलिसांनी या भडकलेल्या तरुणांना अटक केली, त्यात रियाझही होता. 2012 मध्ये त्याची सुटका झाली. त्यानंतर वडिलांकडे पुढील शिक्षणासाठी 7000 रुपये घेऊन रियाझ घराबाहेर पडला. भोपाळच्या इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनिअरिंगला अॅडमिशन घेणार असल्याचं त्याने घरच्यांना सांगितलं. पण त्यानंतर तो घरी परतलााच नाही. काही महिन्यांनी घरच्यांना तो दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचं कळलं. त्या दिवसापासून त्याचा आमच्याशी संबंध संपला, असं त्याचे वडील सांगतात. गुप्तचर संस्थांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 9 वाजता या क्रूर दहशतवाद्याचा खात्मा झाला. त्यानंतर हा रियाझ नायकूच आहे याची ओळख पटवण्यासाठी पुढचे साडेपाच तास खर्ची पडले. रियाझला संपवण्यासाठी सुरक्षा दलांनी विशेष पिनपॉइंटेड ऑपरेशन केलं होतं. काल रात्रीपासून ही कारवाई सुरू होती. पुलवामाजवळच ही कारवाई झाली. अन्य बातम्या उद्धव ठाकरे बिनविरोध आमदार होणार नाही, काँग्रेसने घेतली वेगळी भूमिका आता या तिसऱ्या लॉकडाऊननंतर काय? सोनिया गांधींचा मोदींना थेट सवाल कोरोनाचा आपोआपच नाश होणार? शास्त्रज्ञांना दिसून आला व्हायरसमध्ये विशेष बदल
  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published:

  पुढील बातम्या