VIDEO: हंदवाडा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, मोस्ट वॉन्टेंड दहशतवादी सलाहुद्दीनची कबूली

VIDEO: हंदवाडा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, मोस्ट वॉन्टेंड दहशतवादी सलाहुद्दीनची कबूली

सलाहुद्दीन हा नायकूचं कौतुक करताना या व्हिडीओत दिसत आहे. पाकिस्तानच्या कमकुवत धोरणांमुळे भारताचं पारडं जड आहे असंही त्याने म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 10 मे: जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांवर दहशतवाद्यांनी हंदवाडामध्ये हल्ला केला होता. हा हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याची कबूली हिजबुल मुजाहीद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन याने दिली आहे. हिजबुलचा कमांडर कमांडर रियाज नायकूचा सुरक्षा दलांनी 6 मेला खात्मा केला होता. सलाहुद्दीनने त्याच्यासाठी खास शोकसेभेचं आयोजन केलं होतं. अमेरिकेने त्याचा व्हिडीओ जारी केला आहे. सलाहुद्दीनला आतंरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषीत करण्यात आलं असून तो उघडपणे पाकिस्तानात वावरत असल्याचं सिद्ध झालं आहे.

सलाहुद्दीन हा नायकूचं कौतुक करताना या व्हिडीओत दिसत आहे. 2017मध्ये त्याने जबाबदारी घेतली होती. हंदवाडा एन्काउंटरमध्ये पाच जवान शहीद झाले होते. मात्र पाकिस्तानच्या कमकुवत धोरणांमुळे भारताचं पारडं जड आहे असंही त्याने म्हटलं आहे.

गेली अनेक वर्षं 'तो' काश्मीर खोरं अशांत राहावं म्हणून लोकांना भडकवण्याचं काम करत होता. सुरक्षा दलाचे जवान त्याचं लक्ष्य होतं. कुख्यात दहशतवादी आणि हिज्बुल मुजाहिदीनचा प्रमुख कमांडर रियाझ नायकू (Riyaz Naikoo) याचा सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत अखेर खात्मा झाला. तो काश्मिरी दहशतवादाचा नवा चेहरा बनू पाहात होता.  काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांना हे मोठं यश कसं मिळाली, याची माहिती आता समोर येत आहे.

सुरक्षा दलाच्या या कारवाईत एकही निष्पाप नागरिक मारला गेला नाही किंवा जखमीही झाला नाही. रात्रीत सापळा रचून दहशतवाद्याला लक्ष्य केलं गेलं.

रियाझ नायकू हा गेले अनेक दिवस काश्मीर खोऱ्यात दहशत पसरवत होता. त्याच्यावर 12 लाखाचं इनाम जाहीर करण्यात आलं होतं. पोलीस आणि सुरक्षा दलाला लक्ष्य करत त्याने काश्मीरमध्ये अनेक कारवाया केल्या होत्या. दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत रियाझ मारला गेला.

First published: May 10, 2020, 7:44 AM IST

ताज्या बातम्या