पणजी, 9 जुलै : लग्नाच्या आधी त्या व्यक्तींची HIV चाचणी आवश्यक असल्याबद्दलचा एक कायदा बनणार आहे. हा कायदा गोवा सरकार बनवणार आहे. गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी हा कायदा आणण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावावर कायदे विभागाचं मतही आजमावलं जात आहे.
VIDEO तुरुंगातून सुटणारे गुंड काढतात मिरवणुका, पोलिसांचा धाक संपला का?
लग्नाच्या आधी जर HIV चाचणी घेण्यात आली तर पती आणि पत्नी, दोघांच्याही आरोग्याच्या दृष्टीने ते हितकारक ठरेल, असा या कायद्यामागचा विचार आहे. कायदे विभागासोबतच आणखीही विभागांकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या संबंधित विभागांनी संमती दिली तर याबदद्लचा कायदा पावसाळी अधिवेशनात बनवला जाईल. गोव्याचं पावसाळी अधिवेशन 15 जुलैपासून सुरू होतं आहे.
थॅलिसिमियाच्या चाचणीचाही प्रस्ताव
HIV प्रमाणेच थॅलिसिमियाबदद्लच्या चाचणीचाही प्रस्ताव आहे. ही चाचणी घेतली तर विवाहित दाम्पत्याला होणारं मूल या आजारामुळे बाधित होऊ शकणार नाही याची काळजी घेता येईल. हे दोन्ही कायदे प्रत्यक्षात आणण्यासाठी आरोग्य मंत्री विश्वजीत राणे प्रयत्न करत आहेत. गोवा हे प्रगतिशील राज्य असल्यामुळे तिथे हे कायदे लागू करता येतील, असं विश्वजीत राणेंचं मत आहे.
याआधाही झाला होता प्रयत्न
लग्नाआधी HIV टेस्ट आवश्यक करण्याचा मुद्दा याआधीही गोव्यामध्ये चर्चेत आला होता. 2006 मध्ये त्यावेळचे आरोग्य मंत्री दयानंद नार्वेकर यांनी हा प्रस्ताव ठेवला होता. गोवा कॅबिनेटने या प्रस्तावाला मंजुरीही दिली होती. पण हा कायदा अस्तित्वात येऊ शकला नाही.
===========================================================================================
#NZvIND सामन्यात पहिल्याच चेंडूवर नेटकऱ्यांकडून ट्रोल, या आणि इतर टॉप 18 बातम्या
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा