HIV पॉझिटिव्ह युवकानं फसवूण केलं लग्न, वर्षभरानंतर पत्नीला कळलं आणि...

HIV पॉझिटिव्ह युवकानं फसवूण केलं लग्न, वर्षभरानंतर पत्नीला कळलं आणि...

एका युवकाला HIV लागण झाली होती, तरी त्याने गुपचूप लग्न केले. आता त्याच्या पत्नीही HIV पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

  • Share this:

हरियाणा, 01 सप्टेंबर : एकीकडे कोरोनाच्या संकटात कमीत कमी लोकांमध्ये विवाह होत असताना हरियाणामधून एक धक्कादाय बातमी समोर आली आहे. येथे एका युवकाला HIV लागण झाली होती, तरी त्याने गुपचूप लग्न केले. आता त्याच्या पत्नीही HIV पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या नवऱ्यासह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी फसवणूक, हुंडा, छळ यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या महिलेने पोलिसांना सांगितले की लग्नानंतर तिच्या सासरच्यांनी तिला हुंडाबाबत त्रास देण्यास सुरुवात केली.

वाचा-VIDEO : घरकाम करणाऱ्या महिलेची 3 वर्षांच्या चिमुकल्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

पीडित महिलेचा मागील वर्षी कैथल येथील एका तरूणसोबत लग्न झाले होते. नंतर तिला समजले की लग्नाआधीच तिचा नवरा एचआयव्ही संक्रमित होता . यानंतर सासरच्यांनी समाजाची भीती दाखविली आणि तिला शांत बसण्यास सांगितले.

वाचा-रस्ते इतके खराब की मृतदेहाला खांदाही देता येत नाही, आधुनिक भारताला लाजवणारे फोटो

त्यानंतर या महिलेनं पोलिसांत गुन्हा दाखल केला. पीडित महिलेनं फसवणूक, हुंडा, छळवणूक फसवणूक विविध कलमांखाली तिचा पती, मेव्हणी, सासरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

वाचा-पोलीस हत्येचा तपास करत असतानाच 'ती' परतली, व्हिडीओ टाकत म्हणाली...'मी जिवंत आहे'

महिला पोलिस स्टेशन प्रभारी शीला देवी यांनी सांगितले की, तक्रारीनंतर तिच्या पतीसह चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत दोषींना सोडले जाणार नाही, कठोर कारवाई केली जाईल.

Published by: Priyanka Gawde
First published: September 1, 2020, 1:27 PM IST

ताज्या बातम्या