Home /News /national /

पोटच्या 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करत होता HIV बाधीत बाप, कोर्टाने दिली 'ही' शिक्षा

पोटच्या 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करत होता HIV बाधीत बाप, कोर्टाने दिली 'ही' शिक्षा

नराधमाचा मृत्यू होत नाही तोपर्यत तुरुंगातून त्याची सूटका न करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

    तंजावूर(तमिळनाडू),8 जानेवारी: आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी कोर्टाने 31 वर्षीय नराधम बापाला चार वेळा जन्मठेपेची (Life Imprisonment) शिक्षा सुनावली आहे. धक्कादायक म्हणजे नराधम बाप HIV बाधीत आहे. कुमार असे नराधम बापाचे नाव आहे. महिला कोर्टाच्या न्यायाधीश एजहिलारसी यांनी नराधमाला चार वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. नराधमाली ही शिक्षा एकाच वेळी भोगावी लागणार आहे.नराधमाचा मृत्यू होत नाही तोपर्यत तुरुंगातून त्याची सूटका न करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. राज्य सरकारला दिले हे निर्देश.. कोर्टाने नराधमाला आजीवन कारवासाच्या शिक्षेसह 4,500 रुपये दंड सुनावला आहे. याशिवाय पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नराधम बापाला सहा महिने कारवासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच पीडितेच्या उपचारासाठी पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश कोर्टाने राज्य सरकारला दिले आहे. मधुकरईमधील दिहाडी येथे मोलमजुरी करणाऱ्या कुमारने आपल्या 10 वर्षीय मुलीवर पाशवी बलात्कार केला होता. धक्कादायक म्हणजे कुमार HIV बाधित आहे. धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा भरचौकात लिलाव दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील एका गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीचा भरचौकात लिलाव केल्याची धक्कादायक घटना घडली. बुलंदशहरमधील अहमदगढ ठाण्याच्या हद्दीत एका 16 वर्षीय मुलीवर बोली लावण्यासाठी 20 ते 80 वर्षांचे पुरुष जमले होते. यावेळी मुलगी सतत रडत होती. लिलावात बोली लावणाऱ्यांचा नंबर येताच तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला जात होता. रडून रडून तिचे डोळे लाल झाले होते. ती विनवणी करत होती मात्र याकडे कुणाचेच लक्ष नव्हते. यावेळी पोलीस या ठिकाणी पोहोचताच लिलावासाठी जमलेल्यांमध्ये गोंधळ उडाला. पोलिसांनी 2 महिलांसह 7 जणांना अटक केली आहे. अल्पवयीन मुलीला महिला सेलच्या सुरक्षेत ठेवण्यात आले असून कुटुंबीयांची वाट पाहत आहेत. याबाबत अहमदगढ ठाण्याच्या पोलिसांनी सांगितलं की, रांचीत राहणाऱ्या 16 वर्षीय मुलीच्या आईचा एक वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर साव्त्र आईने तिला कलावती नावाच्या महिलेला 50 हजार रुपयांत विकलं. कलावती नौरंगाबाद गावात आल्यानंतर अल्पवयीन मुलीचा लिलाव होणार असल्याची बातमी पसरली आणि लोकांनी चौकात गर्दी केली. गावातील चौकात अल्पवयीन मुलीचा लिलाव होणार आहे हे समजल्यानंतर अनेकांनी तिथं गर्दी केली. यामध्ये 20 वर्षांच्या तरुणापासून 80 वर्षांपर्यंतच्या वृद्ध पुरुषांचाही समावेश होता. एका व्यक्तीने सर्वाधिक 80 हजार रुपये बोली लावली होती तेव्हाच त्या ठिकाणी पोलीस आहे. पोलिसांनी तिथं कलावती, राजेश देवी, धीरेंद्र, जितेंद्र, इंद्र सिंह, महेंद्र यांना अटक केली. मुलगीला नौरंगाबादमध्ये नेल्यानंतर याची माहिती देण्यात आली. त्यानंतर मुलगी पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी थोड्याच वेळात लोक जमा झाले. यावेळी गर्दी झाल्याने मुलगी पाहण्यासाठी रांग लावली होती. ज्याचा नंबर यायचा तो रक्कम सांगायचा आणि मुलीशी बोलायचा. सुरुवातीला तिला याची कल्पना नव्हती पण जेव्हा आपली विक्री होत असल्याचं समजलं तेव्हा ती रडायला लागली. पोलिसांनी लिलाव करणाऱ्यांच्या तावडीतून सुटका केल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. लिलाव कऱण्यासाठी लावण्यात आलेले 12 हजार रुपयेसुद्धा जप्त कऱण्यात आले. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच चौकशीत अनेक मुली विकल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. झारखंडमधील वेगवेगळ्या भागातील मुली 30-50 हजार रुपयांत खरेदी करून त्या एक लाख रुपयांपर्यंत विकल्या जात असल्याचा धक्कादायक खुलासा यावेळी कऱण्यात आला.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Crime news, Thanjavur S22p30

    पुढील बातम्या