Elec-widget

गावकऱ्यांच्या विचित्र हट्टापायी केला हा अख्खा तलाव रिकामा

या तलावातलं पाणी दूषित झालंय, कलंकित झालंय आणि ते पिण्यायोग्य नाही, अशी या गावातल्या लोकांची धारणा झाली आहे. याचं कारण मात्र थोडं विचित्रच आहे.

  • Share this:

गावकऱ्यांच्या हट्टासाठी हा अख्खा तलाव रिकामा करून नव्यानं भरण्यात येतोय.

या तलावातलं पाणी दूषित झालंय, कलंकित झालंय आणि ते पिण्यायोग्य नाही, अशी या गावातल्या लोकांची धारणा झाली आणि त्याला निमित्त मिळालं एका कथित आत्महत्येचं.

Loading...

ही घटना आहे कर्नाटकातल्या धारवाड जिल्ह्यातली. धारवाडच्या नवलगुंद तालुक्यात मोराबा नावाचं छोटं गाव आहे. या गावाला पाणीपुरवठा या तलावातूनच होतो.

गावातल्याच एका स्त्रीनं या तलावात उडी मारून आत्महत्या केली, असं सांगितलं जातं.

नुसता मृतदेह सापडला म्हणून या गावानं तलावातलं पाणी प्यायला नकार दिलेला नाहीये... खरं कारण वेगळंच आहे.

या तलावात ज्या स्त्रीचा मृतदेह सापडला तिला HIVची लागण झाली होती. आता हे पाणी प्यायल्यावर आपल्यालाही तो आजार होईल या भीतीनं गावकऱ्यांनी सगळा तलाव रिकामा करून पुन्हा भरण्याचा तगादा लावला होता.

तब्बल 15000 नागरिक या तलावाच्या पाण्यावर अवलंबून आहेत.

जिल्हा पंचायतीचे अधिकारी, ग्राम पंचायतीचे काही सदस्य यांनी ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण गावकरी ऐकायला तयार नव्हते. आता या तलावातलं पाणी उपसण्याचं काम सुरू झालं आहे.

सगळं पाणी उपसून तलाव रिकामा करायला किमान ५ दिवस लागतील आणि ताज्या पाण्यानं पुन्हा भरायला पुढचे १५ दिवस जातील. मलप्रभा धरणाच्या तलावाचं पाणी यासाठी वापरण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2018 06:35 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...