HIV बाधित बापाने पोटच्या पोरीवर 7 वर्ष केला बलात्कार, न्यायाधीशही झाले सुन्न

HIV बाधित बापाने पोटच्या पोरीवर 7 वर्ष केला बलात्कार, न्यायाधीशही झाले सुन्न

अशा पित्याला जन्मठेपेपेक्षा कमी शिक्षा देता येणार नाही, असा निकाल कोर्टाने सुनावला

  • Share this:

नवी दिल्ली, 18 मार्च : पित्यानेच आपल्या मुलीवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्याने आपल्या 13 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत.

46 वर्षीय या पित्यावर 13 वर्षांच्या मुलीबरोबरच अन्य 2 मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. Western Cape High Court ने मंगळवारी या प्रकरणात आरोपीला मोठी शिक्षा सुनावली.

हे वाचा - कोरोनाबाधित इटलीतून मुंबईच्या मुलीची सुटका, वडिलांनी मोदींना म्हटलं ‘बापमाणूस’

हा आरोपी 2011 पासून एचआयव्हीग्रस्त आहे. याबाबत त्याला माहित होते. तो आपल्या मुलीवर सलग 7 वर्ष बलात्कार करीत होता. यावर कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सुनावणी देताना न्यायाधीश म्हणाले, या आरोपीला जन्मठेपेपेक्षा कमी शिक्षा होऊच शकत नाही. कारण आरोपीने पीडितेवर अनेकदा अत्याचार केले आहेत.

हे वाचा - नाशिकमध्ये विश्वास नांगरे-पाटील यांच्या सोशल पोलिसिंगला आव्हान?

याबाबत न्यायालयात पीडितेने खुलासा केला आहे. ती म्हणाली, वडिलांनी अनेकदा माझा लैंगिक छळ केला. इतकचं नाही तर आरोपी पीडितेला मारण्याची धमकी देत होता. तुला मारेन, तुला विकून देईन, अशी धमकी दिली जात होती. या प्रकरणात न्यायालयाने मुलीसोबत गैरव्यवहार केल्याप्रकरणी 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तर अन्य दोघांवर बलात्कार केल्याप्रकरणी अनुक्रमे 8 व 4 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

दक्षिण आफ्रिकेत या वर्षी अशी तीन प्रकरणं समोर आली आहेत. ज्यामध्ये वडिलांनी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणात पित्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. गेल्या महिन्यात डरबन येथे राहणाऱ्या व्यक्तीला आपल्या मुलीवर दृष्कृत्य करीत असताना पकडले. त्यालाही जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. 22 वर्षांची ही मुलगी मानसिक ताणातून जात आहे. त्यापूर्वी Pretoria Regional Court मध्ये एका पित्याला आपल्या दोन्ही मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

First published: March 18, 2020, 5:46 PM IST

ताज्या बातम्या