प्यूब्ला, मेक्सिको : जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरबद्दल सगळ्यांनाच एक वेगळ्याच प्रकारची उत्सुकता असते. हिटलरची स्टाइल, त्याने वापरलेल्या वस्तू म्हणूनच सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय असतात.
अशीच हिटलरची बीटल कारही आता चर्चेत आहे. ही गाडी खास हिटलरसाठी बनवण्यात आली होती. हिटलरने पॉर्श कार कंपनीला एक अशी गाडी बनवायला सांगितली की जी सामान्य जनतेमध्येही लोकप्रिय होईल.
क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर धोनी या पक्षाकडून लढणार निवडणूक?
हुकूमशहाच्या या आदेशानंतर फर्डिनांड पॉर्श यांनी 1937 मध्ये फॉक्सवॅगन नावाची कंपनी बनवली आणि 1938 मध्ये त्यांनी पहिली बीटल कार रस्त्यावर आणली.
आता मात्र हिटलरच्या कारकिर्दीची साक्षीदार असलेली ही कार इतिहासजमा होणार आहे.
सामान्य लोकांची कार
मेक्सिकोमधल्या प्यूब्ला शहरातल्या एका कारखान्यात होणारं बीटल कारचं उत्पादन आता थांबवण्यात येणार आहे.हिटलरच्या इच्छेप्रमाणे खरोखरच ही कार सामान्य लोकांसाठी बनवण्यात आली होती आणि पाहतापाहता ती जगभरातल्या प्रसिद्ध कारपैकी एक कार बनली.
मस्तवाल बैलांशी शर्यत लावण्याचा थरार! या सिनेमाची होईल आठवण
बिटल कार लाँच झाल्यानंतर हळूहळू ती मध्यमवर्गीयांची प्रतिष्ठेची कार बनली. या गाडीला जागतिकीकरणाच्या पर्वातली एक महत्त्वाची गाडी मानलं जातं. 1960 मध्ये बीटल अमेरिकेमधलीही सगळ्यात लोकप्रिय कार बनली. त्यामुळे अमेरिेकेचं मोठं मार्केट या गाडीने काबीज केलं.
इतिहासाची साक्ष
फॉक्सवॅगनचं हेडक्वार्टर असलेल्या वोल्फ्सबर्गमध्ये 1978 सालीच या गाडीचं उत्पादन बंद झालं होतं. पण तरीही मेक्सिकोमध्ये 2003 पर्यंत हे उत्पादन सुरूच राहिलं. आता मात्र ही कार रस्त्यावर दिसणार नाही. हिटलरच्या इतिहासाची साक्ष असलेली ही कार सगळ्यांच्याच लक्षात मात्र राहील.
=================================================================================
राज ठाकरेंना आघाडीत घेण्यासाठी काँग्रेसचा विरोध आहे का? अशोक चव्हाण म्हणतात...