गौरी लंकेश हत्या प्रकरण : 'हिट लिस्ट'वर पहिलं नाव गिरीश कर्नाडांचं

गौरी लंकेश हत्या प्रकरण : 'हिट लिस्ट'वर पहिलं नाव गिरीश कर्नाडांचं

संशयिताकडून डायरी मिळाली असून त्यात काही मान्यवरांची नावं आहेत. त्यात गिरीष कर्नाड क्रमांक एकवर असून गौरी लंकेश यांचं नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे.

  • Share this:

बंगळूरू,ता.26 जुलै : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी एसआयटीने आणखी एका आरोपीला अटक केली आहे. सुरेश असं त्याचं नाव असून हल्ल्याचा संशय असलेल्या परशुराम वाघमारे आणि त्यांच्या सहकार्यांना त्याने भाड्याने घरं उपलब्ध करून दिलं होत असा पोलीसांचा आरोप आहे. या प्रकरणाच्या तपासात पोलीसांनी धक्कादायक खुलासाही केला आहे. अटकेतील एका आरोपीकडून एक डायरी मिळाली असून त्यात काही मान्यवरांची नावं आहेत. त्यात गिरीष कर्नाड क्रमांक एकवर असून गौरी लंकेश यांचं नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. ही यादी देवनागरीत लिहिली असून त्यात साहित्यिक बी.टी. ललिता नाईक, निदुम्मिदी मठाचे पुजारी वीरभद्र चन्नामलाल स्वामी आणि पुरोगमी कार्यकर्ते व्दारकनाथ यांचा समावेश आहे.

माझ्या टेबलावर फाईल असती,तर मीच आरक्षण दिलं असतं -पंकजा मुंडे

मराठा आरक्षणासाठी आणखी एका आमदाराचा राजीनामा

हे सर्व मान्यवर डाव्या विचारांचे, पुरोगमी चळवळीचे असून कट्टरतावाद्यांवर त्यांनी सातत्याने टीका केली होती. या सर्व मान्यवरांना संपवण्याचा डाव होता अशी माहितीही पोलीसांनी दिली आहे.

गौरी लंकेश हत्या प्रकरणात आत्तापर्यंत 11 जणांना पोलीसांनी अटक केलीय. गुरूवारी अटक केलेला आरोपी सुरेश हा 36 वर्षांचा असून तुमकूरचा रहिवासी आहे.

शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांना उद्धव ठाकरेंपेक्षा मुख्यमंत्री जवळचे - रवी राणा

'मराठी' तरूणांनो जीव गमावू नका, तुमची वाट पाहणारं घरी कुणीतरी आहे! - राज ठाकरे

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2018 05:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading