मद्यधुंद अवस्थेत चालवत होता कार, नागरिकांना चिरडत टँकरवर आदळली कार, पाहा थरारक VIDEO

मद्यधुंद अवस्थेत चालवत होता कार, नागरिकांना चिरडत टँकरवर आदळली कार, पाहा थरारक VIDEO

कारनं धडक दिल्यानंतर चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्ती गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर बाजारपेठेत मोठी गदारोळ उडाला होता.

  • Share this:

हमीनपूर, 25 डिसेंबर : काळ आला होता पण थोडक्यात निभावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मद्यधुंद तरुणानं कार चालवताना रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना चिरडल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यातील बडसर उपविभागाच्या मुख्य बाजारपेठेत हरियाणाची नंबर प्लेट असलेल्या कारनं रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना धडक दिली आहे. या घटनेनंतर कारमधील 3 जण घटनास्थळावरून फरार झाले आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत 2 जखमी नागरिकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

हे वाचा-पुण्यात मनसेचे खळखट्याक! मराठी भाषेच्या मुद्द्यावर Amazonचं ऑफिस फोडलं

बाजारपेठेत घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की भरधाव कार काही नागरिकांना चिरडून पुढे जात आहे. त्यानंतर ही कार टँकरवर धडकल्याची माहिती मिळाली आहे. या कारमध्ये असलेले 5 जणांपैकी 3 लोक फरार झाले आहेत. तर दोन जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कारनं धडक दिल्यानंतर चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्ती गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर बाजारपेठेत मोठी गदारोळ उडाला होता. या गाडीत काही शस्त्रास्र असल्याची माहिती देखील मिळाली आहे. तर हे तरुण नशेत असल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 25, 2020, 2:24 PM IST

ताज्या बातम्या